नाशिक

बिबट्याने ओढून नेलेल्या ‘श्रुतिक’चा मृतदेह सापडला

एकुलता लेक गेला, कुटुंबाचा आक्रोश, 19 तास शोधकार्य; दीड महिन्यात दुसरी घटना

नाशिकरोड : प्रतिनिधी
बिबट्याने घराच्या ओट्यावरून हल्ला करून उचलून नेलेल्या चिमुकल्या श्रुतिकचा मृतदेह तब्बल 19 तासांच्या शोधकार्यानंतर सापडला. महिनाभरात दोन बालकांचा बिबट्याने बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये वन विभागाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
अवघ्या दोन वर्षांच्या श्रुतिक गंगाधर नावाच्या चिमुकल्याला त्याच्या घराच्या ओट्यावरून नरभक्षक बिबट्याने हल्ला करून उचलून नेले होते. या घटनेने संपूर्ण वडनेर परिसरात भीती आणि दहशत पसरली आहे. लष्कराचे जवान आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांकडून श्रुतिकचा शोध घेतला जात होता. अखेर 19 तासांनंतर या दोन वर्षांच्या बालकाचा मृतदेह बुधवारी (दि. 24) दुपारी तीन वाजता आर्टिलरीच्या जंगलात आढळला आणि सर्वजण सुन्न झाले.
वडनेर गेट परिसरातील कारगिल गेटजवळ असलेल्या क्वार्टरमध्ये राहणार्‍या कुटुंबातील दोनवर्षीय श्रुतिक सायंकाळी घराबाहेर खेळत होता. अचानक जवळच्याच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने क्षणार्धात त्याच्यावर झडप घातली आणि जबड्यात धरून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. काही कळण्याच्या आत घडलेल्या या प्रकाराने मुलाच्या आईने हंबरडा फोडला. पण तोपर्यंत बिबट्या अंधारात पसार झाला होता. यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी आर्टिलरी सेंटरचे जंगल लष्कराचे जवान व वन विभागाच्या अधिकार्‍यांनी पिंजून काढले. सुमारे अडीचशे ते तीनशे अधिकारी, कर्मचारी मृत बालकाचा शोध घेत होते. त्यासाठी थर्मल ड्रोन, श्वानपथक यांचा वापर करण्यात आला. त्यानंतर बुधवारी (दि. 24) दुपारी तीन वाजता श्रुतिकचा मृतदेह आर्टिलरीच्या जंगलात आढळून आला.
श्रुतिकचे वडील गंगाधर लष्करी जवान असून, ते मूळचे कर्नाटकचे आहेत. त्यांची एक वर्षापूर्वीच नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटरमध्ये बदली झाली होती. श्रुतिक हा एकुलता मुलगा होता. मात्र, त्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वन विभागावर नागरिकांचा संताप

विशेष म्हणजे, मागील ऑगस्टमध्ये वडनेर दुमाला येथे आयुष भगत या तीन वर्षांच्या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यावेळी वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्याचे आश्वासन दिले होते. या मागणीसाठी माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी मुसळधार पावसात वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढून जाब विचारला होता. मात्र, वन विभागाच्या अजगरासारख्या सुस्त कारभारामुळे आज पुन्हा एकदा एका निष्पाप बालकाचा जीव गेला, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. अजून किती चिमुकल्यांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी जाण्याची वाट वन विभाग पाहणार आहे, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

 

 

Editorial Team

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

3 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

3 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

3 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago