आस्वाद

सत्यासत्यता मन जाणे । साक्ष देई अंतःकरण

मनाला सुन्न करणार्‍या अनेक घटना आपल्या आसपास सतत घडत असतात. एखादी गोष्ट अशी घडते कि सगळे समाजमन सुन्न होऊन जाते. सगळीकडे संतप्त प्रतिक्रिया उमटतात. जणू काही जाग आल्यासारखा प्रतिक्रियांचा पाऊस पडतो.
अशा घटना अचानक घडत नाहीत. अनेक वर्षे त्या सुरू असतात. पण जोवर त्या उघडकीस येत नाही तोवर त्याकडे कुणाचेचं लक्ष का जात नाही? चुकीचे घडताना दिसत असूनही विरोध करण्यासाठी एकत्रित येण्याची मानसिकताचं संपली आहे कि काय! जोपर्यंत ती झळ आपल्या पर्यंत किंवा आपल्या जिवलगा पर्यंत येत नाही तोवर मला काय त्याचे अशी बघ्याची भूमिका घेण्याची सवय नकळत तर जडत नाहीए ना? मनाला पटत नसणार्‍या गोष्टींच्या मागे वहावत जाणे का घडत असावे? सुशिक्षित म्हणवल्या जाणार्‍या समाजाची अशी अधोगती का होतं असावी? कसली एवढी हतबलता असावी जी स्पष्ट दिसणार्‍या चुकांनाही स्वीकारत जाते? अनेक कारणे असतील यामागे. काही समोर येतात, काही तशीच झाकली जातात. अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त करणार्‍या या घटनांकडे बघताना फक्त चर्चा नाही तर बदल घडनेही तितकेचं महत्वाचे असते. शिक्षणाने माणूस शहाणा होतो असे म्हटले जाते. कुणाची फसवणूक करणारे किंवा फसवणूक होताना योग्य मार्ग दाखवू न शकणारे शिक्षण काय कामाचे? केवळ माहितीचा साठा न राहता चिकिस्तक विचार करण्याची सवय शिक्षणातून रुजायला हवी. मानसिक, भावनिक ताणतणाव, विविध गरजा, असुरक्षितता, वैज्ञानिक दृष्टीचा आभाव, आर्थिक अडचण, कर्जबाजारीपण, कुठल्याही गोष्टीचा हव्यास, यशस्वी होण्यासाठी मेहनतीपेक्षा एखाद्या आडमार्गाचा आधार शोधणे किंवा निव्वळ करून पाहायला काय हरकत आहे! अशी मनोवृत्तीसुद्धा न पटणार्‍या गोष्टीकडे माणसाला आकर्षित करू शकते. जे फसले जातात, त्यांना नावे ठेवण्यापेक्षा शक्य झाल्यास वेळीच सावध करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. आयुष्य हे कायम सुखासीन असे कुणाचेच नसते. आयुष्य म्हणजेच अनंत अडचणीची चढनचं आहे, जी आपण डोळसपणे विचारपूर्वक चढत गेलो तर प्रवास सुलभ आणि सहज होऊ शकतो. हातात शोधाचे यंत्र आहे दिमतीला. ज्यात क्षणात सगळी माहिती समोर येते. ज्ञान माहिती मनोरंजनाचे हत्यार सोबत घेऊन फिरणे ही केवळ प्रौढी मिरवण्याची गोष्ट नसून ती एक जबाबदारीसुद्धा आहे. या साधनांचा वापर काही चुकीचे पसरविण्यासाठी न करता, थांबविण्यासाठीसुद्धा करता येऊ शकतो.
संत तुकाराम महाराज सांगतात,
सत्यासत्यता मन जाणे ।
साक्ष देई अंतःकरण ॥
योग्य अयोग्य ओळखन्याची साक्ष आपलेच मन देत असते. ते वेळीच ओळखता यायला हवे.
खूप कुणावर विसबून राहणे ही गरज बनू देऊ नये. कुटुंब हाच करा आपला आधार असतो. कठीण प्रसंगी पाठीशी उभी राहणारी तीच खरी आपली माणसे असतात. कितीही संकट आले तरी आपल्या माणसांवर विश्वास ठेवून त्याच्याजवळ मन मोकळे करावे. फसव्या गोष्टी ओळखायला शिकावं. आपली दुःख अडचणी या आपल्याच असतात. मार्ग ही आपणच शोधायचा असतो. पण या सगळ्यात आपले मन, शरीर, विचारांवर कुणालाही ताबा मिळवू देऊ नये. आपली सद्सदविवेकबुद्धी जागरूक ठेवून विचारपूर्वक निर्णय घेण्याची सवय रुजवावी. प्रलोभनाचे मृगजळ खूप आकर्षक दिसते. वेळीच सत्य-असत्यता पडताळून पाहता यायली हवी.
डोळे दीपवणारा प्रकाश हा नेहमी खराच असेल असे नाही.चकाकते ते सोनेच असेल असे नाही. अनेक चांगल्या गोष्टीही अवतीभोवती असतात. चांगल्या-वाईटातील फरक ओळखणारी दृष्टीच नाही तर दृष्टिकोन मिळवायला हवा आणि मनापासून प्रयत्न केले तर नक्कीच अशक्य असे काही नाही.

Truthfulness is the mind’s knowledge. The heart bears witness.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…

13 hours ago

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

13 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

13 hours ago

गुन्हेगारीकडे नेणारे यशाचे शॉर्टकट्स

यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…

13 hours ago

परिवर्तनाकडे नेणारी कलाकृती- निळी सावळी नव्हाळी

आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…

13 hours ago

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…

13 hours ago