आस्वाद

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य बाहेर सर्वकाही शोधतो, पण स्वतःला शोधत नाही, हीच अज्ञानाची खरी ओळख आहे.
मनुष्य कितीही शिकलेला असेल आणि नीटनेटके राहणीमानही असेल, पण वागण्यात शालीनता नसेल आणि विचारांमधेही शुद्धता नसेल तर हे एक प्रकारचे अज्ञान म्हणावे लागेल. अज्ञान म्हणजे मी कोण आहे विसरणे आहे.
ही सर्व सृष्टी देवाने निर्माण केलेली आहे. सृष्टीच्या कणाकणांत ईश्वर आहे. मनुष्य हा एक देहरूपी मानव आहे. मनुष्य नातेसंबंधात स्वतःची ओळख शोधत असतो; परंतु माणसातल्या देवाला विसरतो. एखादी व्यक्ती ईश्वराचे सतत नामस्मरण करत असेल आणि एखाद्याला खूप त्रास देत असेल, खोटे बोलत असेल. एखाद्याला टोमणे मारणे, अपमान करणे अशा प्रकारचे कृत्य करत असेल, तर त्या नामस्मरणाला काहींच अर्थ राहत नाही. मनाचा निचरा हा केला नाही आणि वागण्यात आचरणात विचारांची शुद्धता नसेल तर त्या देवत्वाचा काहींच उपयोग होत नाही. एका क्षणिक अहंकाराच्या खोट्या भ्रमात राहून अगदी किळसवाने लाजिरवाणेे कृत्य एखादी व्यक्ती दुसर्‍या कोण्या एका व्यक्तीबरोबर करत असते तेव्हा नकळत त्या त्रयस्थ व्यक्तीचा तळतळाट लागल्याशिवाय राहत नाही.खुर्चीचा अहंकार आणि मनाचा अहंपणा या दोन गोष्टीमुळे माणुसकी मरत चालली आहे, हे दिसते. मित्रांनो, अहंकाराने मने दूषित होऊन माणसामाणसांतले अंतर वाढत जाते. आणि प्रत्येक व्यक्ती मैत्रीमध्ये एकमेकांपासून दुरावली जाते. क्षणिक काळानंतर एका विशिष्ट वेळेनंतर ती खुर्ची आणि अहंकारही राहत नाही.
मग ह्या खोट्या अहंकाराला आपण मनात का स्थान देतो? कुठलीही गोष्ट व सुख काही काळापुरते असते आणि नियती एकदा पुन्हा त्या मनुष्याला त्याची जागा दाखवत असते.
नियतीपुढे सर्वांनाच एक ना एक दिवस झुकावे लागते. मग या मनात घाणेरड्या विचारांचा कचरा का असतो? मनुष्याने मनातला दृष्ट चक्रांचा कचरा साफ केला पाहिजे आणि विचारांमध्ये शुद्धता आणली पाहिजे. मनुष्याने वाईट विचारांचा निचरा केला पाहिजे. आत्म्याची ओळख लक्षात ठेवून तसे चांगले वर्तन आचरणात आणणे हेच आत्मज्ञान होय. आत्मज्ञान म्हणजे काही नवीन मिळवणं नाही. ते आधीपासून आपल्यात आहे. फक्त अज्ञानाचा पडदा दूर केला की, आत्मज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो.आत्मज्ञान आलं की, मनुष्य बदलतो. आत्म्याला जाणणे म्हणजे हा सद्गुरूंचा मार्ग अवलंबणे होय.
(सदर लेखाचा कुठल्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. तसे आढळल्यास तो योगायोग समजावा.)

Drainage of the mind and purity of thoughts

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

18 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

18 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

18 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

18 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

18 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

19 hours ago