नऊ प्रवासी जखमी; बसेसच्या दर्शनी भागाचे नुकसान
येवला : प्रतिनिधी
मनमाड-येवला राज्य महामार्गावर येवला तालुक्यातील मुखेड फाट्यावर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास एसटी बस आणि हिरकणी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात सात ते नऊ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, दोन बसेसमध्ये झालेल्या अपघातात गाड्यांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथे येवला-नाशिक राज्यमार्गावर येवल्याकडून येणारी बस आणि नाशिककडून येणारी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. दोन्ही बसेस वेगात असताना समोरून येणार्या वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला.
या अपघातात जीवन बाबूराव माळी (वय 50), संतोष शिवाजी गायकवाड (46), आकांक्षा राजेश भालेराव (24), अनिता संतोष गायकवाड (34), बाबूराव शंकर धुमाळ (65), लीलाबाई बाबूराव धुमाळ (50), राहुल बापू जाणे (36) आदी प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोन्ही एसटी बसमधील प्रवाशांना जबर मार लागला आहे. प्रवाशांच्या हात, पाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सदर जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघातानंतर येवला- नाशिक राज्य महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
Buses collide head-on at Mukheda junction
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…