नाशिक

कामाचा बोजा, पोटासाठी बालपण हरवले

वर्षभरात 23 धाडसत्र, 16 बालकामगारांची सुटका

नाशिक : देवयानी सोनार
खेळण्या – बागडण्याच्या वयात व शिक्षणाच्या वयात कामाच्या ओझ्याखाली दबलेल्या 16 बालकांची नाशिक जिल्ह्यात गेल्या वर्षभरात बालमजुरीतून सुटका करण्यात आली. 23 धाडसत्रांतून या बालकांना वाचविण्यात आले असून, त्यापैकी 9 बालकांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. सुटका केलेल्या सर्व बालकांना बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले असून, त्यापैकी नऊ बालकांना पुन्हा शाळेत दाखल करून पुनर्वसनाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.
हातात पुस्तक, शाळेची बॅग आणि डोळ्यात स्वप्न असण्याच्या वयात अनेक मुलांच्या वाट्याला अजूनही कामाचे साधन, जीवन जगण्यासाठी लागणार्‍या अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा, चिंता, संघर्षाचे आयुष्य येत आहे. बालपणीचा आनंद अनुभवण्याऐवजी अनेक बालकांना मजुरीच्या विळख्यात अडकावे
लागत आहे.
बालमजुरीविषयी कठोर कायदे असले तरी अनेक ठिकाणी बालकामगार आढळून येतात. हॉटेल्स, गॅरेज, कारखाने, बांधकाम साइट, चहाच्या टपर्‍या, हमाली, क्षमतेपेक्षा जास्त ओझे वाहून नेण्यासाठी मजूर म्हणून अशा अनेक ठिकाणी मुले काम करताना दिसून येतात. काही वेळा ही मुले स्वइच्छेने नाही तर गरिबी वा झटपट श्रीमंत होण्याच्या नादात बालमजुरीस भाग पाडतात. अजूनही शहर आणि उपनगरांतील अनेक गॅरेज, हॉटेल्स, वाहनविक्रीची दुकाने, बांधकाम साइटस्वर बालमजूर दिसून येतात. परंतु, कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कामगार विभागाने अजून धाडसत्र मोठ्या प्रमाणात करून बालमजुरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी होत आहे.
बालमजुरीमागे पालकांची आर्थिक अडचण, बेरोजगारी तसेच शिक्षणाबाबत जनजागृतीचा अभाव ही प्रमुख सामाजिक कारणे आहेत.
धाडसत्रांमध्ये आढळून आलेल्या बालकांना तातडीने रेस्क्यू करून महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या बालसंगोपन योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासही विभागाकडून मदत केली जाते. इतर राज्यांतील बालकांच्या बाबतीत बालकल्याण समितीच्या आदेशानुसार संबंधित पालकांच्या ताब्यात देऊन त्यांना मूळ राज्यात पाठविण्याची प्रक्रिया केली जाते.

बाल मदत क्रमांक 1098 वर 40 तक्रारी
जिल्ह्यात बालमजुरीसंदर्भात वर्षभरात सुमारे 140 कॉल्स व तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 40 तक्रारी बाल मदत क्रमांक 1098 वर प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी नाशिक शहर आणि नाशिक तालुक्यातून येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बालकामगार प्रथा ही मुलांच्या हक्कांचे उल्लंघन करणारी सामाजिक समस्या आहे. समाजातील प्रत्येक घटकाने बालकामगारांना प्रोत्साहन न देता त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बालकामगारमुक्त समाज निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. बालहक्कांच्या संरक्षणासाठी आणि प्रत्येक बालकाला सुरक्षित व सन्मानपूर्वक बालपण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करूया. – समीरा येवले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, नाशिक

बालमजुरी करताना कोणी आढळले तर 1098 या हेल्पलाइनवर कळवावे. आपल्या आजूबाजूला कोणी बालमजूर राहणार नाही, ज्या मुलांची शाळा काही कारणास्तव बंद झाली असेल, अशा मुलांना शाळेच्या प्रवाहात एक जबाबदार नागरिक म्हणून आणावे. बालकांना बालमजुरीपासून दूर ठेवून शाळेच्या मुख्य प्रवाहात आणूया. – सुनील दुसाने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

 

Burdened by work, childhood lost to the struggle for survival.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

2 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

2 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

2 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

2 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

3 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

3 hours ago