नाशिक

म्हसरूळला पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांची बाजारपेठेतून धिंड

गुन्हेगारांविरोधात पोलिस अ‍ॅक्शन मोडवर

पंचवटी : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे मखमलाबाद, म्हसरूळ भागातील गुन्हेगारी व भाईगिरी कमी करण्याच्या दृष्टीने, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी म्हसरूळ पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. सराईत गुन्हेगारांची कणसरा माता चौक, शांतीनगर आदी भागांतील बाजारपेठेतून धिंड काढली. यामुळेे नागरिकांकडून पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शांतीनगर, अश्वमेधनगर, चाणक्यपुरी सोसायटी, कणसरा माता चौक आदी भागांत वर्चस्व सिद्ध करण्यासाठी गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बाजारपेठा व रहिवासी भागात सुरक्षितता वाढवणे, गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करून कायदा-सुव्यवस्था राखणे, स्थानिक नागरिकांत पोलिसांबद्दल विश्वास निर्माण व्हावा यादृष्टीने म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक पटारे, परदेशी, योगेश परदेशी, जी. सी. जोशी यांनी हर्ष प्रदीप काकडे (वय 20, रा. साईपुष्प अपार्टमेंट, ओमकार नगर, पेठ रोड), ओम खंडू आहेर (19, रा. गणेश अपार्टमेंट, वाढणे कॉलनी, म्हसरूळ), धनराज सदानंद गणेशकर (विद्यानगर, मखमलाबाद), उमेश प्रल्हाद खनपटे (रा. अश्वमेधनगर, म्हसरूळ), करण शांताराम आहेर, (रा. अश्वमेधनगर, म्हसरूळ) या सराईत गुन्हेगारांची कणसरा माता चौक, चाणक्यपुरी सोसायटी, शांतीनगर, अश्वमेधनगर आदी भागांतून धिंड काढली.
पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे स्थानिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटला आहे. पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
नागरिकांनीदेखील पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असेे आवाहन करण्यात आले आहे.

येणार्‍या काळात कठोर मोहीम राबविणार

गुन्हेगारी, भाईगिरी यांसारखे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत.पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा, तसेच म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसर गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नागरिकांनीदेखील पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. येणार्‍या काळात म्हसरूळ परिसरात अशाच प्रकारच्या कठोर मोहिमा राबविण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट आहे जेणेकरून म्हसरूळ परिसर गुन्हेगारीपासून मुक्त होईल.
– अंकुश चिंतामण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म्हसरूळ पोलिस ठाणे

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

19 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

20 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

20 hours ago