अर्ध्या तासात 75 हजारांचा ऐवज लांबविला; गुन्हा दाखल
सिन्नर ः प्रतिनिधी
शहरातील विजयनगर भागात फ्लॅटला कुलूप लावून शेजारील अपार्टमेंटमध्ये गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी तीर्थराज अपार्टमेंटमधील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून घरफोडी करत रोख रकमेसह सोन्याचे दागिने मिळून 73 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.10) दुपारी 12.15 ते 12.45 वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान, पोलिस स्टेशनपासून अगदी जवळ असलेल्या विजयनगर भागात भरदिवसा अन् केवळ अर्ध्या तासातच चोरट्यांनी घरफोडी केल्याने चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढत असल्याचे या घटनेवरून अधोरेखित झाले आहे. विजयनगर परिसरात तीर्थराज अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. 3 मध्ये शिनाबाई बाळकृष्ण सानप या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून, शुक्रवारी (दि.10) दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास शिनाबाई आपल्या फ्लॅटच्या दरवाजाला कुलूप लावून शेजारील अपार्टमेंटमध्ये गेल्या असता अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत सानप यांच्या बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला व कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले 7 हजार रुपये रोख रकमेसह 31 हजार 673 रुपये किमतीचे 3.040 ग्रॅम वजनाचे बी. टॉप्स व लटकन 2 नग, 18 हजार 542 रुपये किमतीची 1.780 ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या रिंगा 2 जोड, 16 हजार 185 रुपये किमतीची 1.510 ग्रॅम सोन्याची लहान मुलाच्या कानातील बाळी 1 नग असा एकूण 734 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास शिनाबाई सानप आपल्या घरी परतल्या असता, घरफोडी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच शिनाबाई सानप यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. सानप यांच्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. तपास हवालदार जाधव करीत आहेत.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…