नाशिक

नाशिक रोडला डोबी मळ्यात बिबट्यासाठी पिंजरा

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
मांजरीच्या मागे लागलेल्या बिबट्याने मांजरीपाठोपाठ घराच्या छतावर झेप घेतल्याने भिंत पडल्याची थरारक घटना देवळाली गावाजवळील डोबी मळ्यात सोमवारी घडली. दरम्यान, वनाधिकार्‍यांंनी येऊन पंचनामा केला तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला.
देवळाली गावाजवळ रोकडोबावाडी आहे. येथे लष्कराच्या हद्दीत दाट जंगल आहे. बुवा, हांडोरे, लवट, औटे आदींचे शेतमळे येथे आहेत. डोबी मळ्यात अनेक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आहे. मळ्यातून एक मांजर उचलून नेली. दुसर्‍याच दिवशी सोमवारी सायंकाळी पाच वाजता बिबट्या पुन्हा मांजरीच्या मागे लागला. जीव वाचवण्यासाठी मांजर भीमानाथ बुवा यांच्या घराच्या पत्र्यावर चढली. मागे लागलेल्या बिबट्यानेही घराच्या छतावर उडी घेतली. मात्र, त्याच्या वजनामुळे घराची भिंत कोसळली आणि पत्र्यांचेही मोठे नुकसान झाले. मोठा आवाज झाल्याने परिसरातील प्रमोद बुवा, अनिल बुवा, अरुण बुवा, कैलास बुवा, गुड्डू बुवा, विश्वनाथ बुवा यांनी तातडीने धाव घेतली. माणसाची गर्दी झाल्याने बिबट्या पुन्हा जंगलाच्या दिशेने पसार झाला. मात्र, रात्री दीडच्या सुमारास बिबट्या पुन्हा आला. राजा नावाच्या बैलाच्या हंबरण्याने बुवा कुटुंब जागे झाले अन् बिबट्या
पळून गेला.
गेल्या काही वर्षांत बुवा मळ्यात आठ बिबटे वनविभागाने जेरबंद केले आहेत. पुन्हा बिबट्याचा मोठा वावर वाढला असून, सध्या चार बिबटे असल्याचे बुवा यांनी सांगितले. रात्री शेताला पाणी देण्यासाठी शेतकरी गटागटाने व हातात काठ्या घेऊनच जातात. हांडोरे मळ्यात तीन महिन्यांपूर्वी बिबट्याने मुलीवर हल्ला केला होता. डोबी मळ्यातील शेतात बिबट्या कुटुंबासह राहतो. त्यामुळे बुवा कुटुंबीयाने वाघ्या नावाचा कुत्रा पाळला आहे. बिबट्याला तो घराकडे येऊही देत नाही. मात्र, काल आजारी असल्याने तो बिबट्याला हाकलू शकला नाही. राजा नावाचा बैल हादेखील बिबट्याला घाबरत नाही. त्याच्यामुळे बिबट्याला रात्री माघार घ्यावी लागल्याचे बुवा यांनी सांगितले.

 

Editorial Team

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago