प्रतिमा

वटपौर्णिमा

परंपरेतून पर्यावरणापर्यंत नेणारा सांस्कृतिक वारसा

प्रार्थनेची शक्ती आपल्या मनातील आकांक्षा दात्यापर्यंत पोहोचवते. भारतीय संस्कृतीत सणावारांना विशेष महत्त्व आहे. कारण त्यातून प्रत्येक नातेसंबंधाला बांधून ठेवण्याची ताकद निर्माण होते. प्रत्येक सणामागे काहीतरी उद्देश असतो, जो कळत नकळत साध्य होतो.
व्रतवैकल्ये स्त्रीजीवनाशी निगडित असून, ती अगदी बालवयापासून ते विवाहापर्यंत प्रत्येक नात्यामध्ये उतराई होताना दिसतात. विवाहानंतर मात्र, तिच्या हळव्या आणि लाघवी मनाची एकच आकांक्षा असते ती म्हणजे, तिचे सौभाग्य. जन्मोजन्मी सौभाग्याचे दान मिळावे, जन्मोजन्मी तुझ्या ऋणानुबंधात मी राहावे. शिव-पार्वतीपासून ते आजही पती-पत्नीच्या नात्यात एक अतूट, पवित्र बंधन आहे. विवाह हे फक्त बंधन नाही, तो एक बंध आहे.
काही हजारो वर्षांपूर्वी सावित्रीने आपल्या पतीचे, म्हणजेच सत्यवानाचे प्राण वटवृक्षाच्या छायेत वाचवले, असे आपण ऐकत आलो आहोत. याचा ऊहापोह न करता, यातून आपल्या प्रिय व्यक्तीवरील आस्था आणि प्रार्थनेची ताकद समजते. ती एक हृदयस्पर्शी शक्ती आहे. तुम्हारी प्रार्थना फूल की गंध की तरह होनी चाहिए.- ओशो.
आज आपल्यावर सत्यवान आणि सावित्रीसारखी वेळ येणार नाही. कारण तितके अरण्य आणि एकांत हे फक्त नावापुरते उरले आहे. त्याची जागा आता झगमगाट जीवनशैली आणि दिखाव्याने घेतली आहे. असो. याच आख्यायिकेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला तर, आजच्या सावित्रीच्या लेकी म्हणून आपलेही उत्तरदायित्व महत्त्वाचे आहे. ते या अर्थाने की, सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या विविध झाडांचे वृक्षारोपण आणि त्यांचे संरक्षण म्हणजे आजच्या आपल्या प्रत्येकाच्या श्वासाचे रक्षण म्हणता येईल.

सुनीता सानप-सांगळे

Editorial Team

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago