नागपूर : वर्धा मार्गाने घरी जात असताना अचानक कारमधून धूर निघायला लागला. चालकाने कार थांबवली आणि कारमधून बाहेर पडताच कारचा भडका उडाला. ही घटना शनिवारी रात्री छत्रपती उड्डाणपुलावर घडली. प्रतापनगर पोलिस व अग्निशमन यंत्रणाही पोहोचली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. हर्षल महाजन (वय 35, रा. बुटीबोरी) असे कारचालकाचे नाव आहे. हर्षल मूळचे अकोल्याचे असून, नागपुरात नोकरी करतात. शनिवारी रात्री कार्यालयातील काम आटोपून ते एमएच-30-एए-4485 या क्रमांकाच्या कारने घराकडे निघाले होते. छत्रपती उड्डाणपुलापर्यंत गेले असता, कारच्या मागच्या भागातून धूर निघायला लागला. मागच्या वाहनचालकाने लगेच ही माहिती दिली. हर्षलने लगेच कार थाबवली आणि बाहेर पडले. क्षणभरात कारने भडका घेतला. रस्त्याने जाणार्या वाहनचालकाने सांगितले नसते तर अनर्थ घडला असता.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…