नाशिक

लासलगावात कारची काच फोडून 70 हजार रुपये लांबवले

लासलगाव : वार्ताहर

लासलगाव येथील मेन रोडवर असलेल्या एका हॉटेलसमोर पार्क केलेल्या किराणा दुकानदाराच्या वेगनआर कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल 70 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या धाडसी चोरीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, व्यापार्‍यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार,भरवस फाटा येथील अभय किराणा दुकानाचे मालक आनंदा शांताराम घोडेगावकर हे किराणामाल खरेदी करण्यासाठी लासलगाव येथे आले होते. किराणामाल खरेदी केल्यानंतर औषधोपचार घेण्यासाठी आणि नाश्ता करण्यासाठी त्यांनी मेन रोडवरील एका हॉटेल समोर आपली कार (एमएच 15 जीआर 7801) उभी केली. घोडेगावकर हॉटेलमध्ये थांबलेले असताना या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कारच्या मागील डाव्या बाजूची काच फोडली. त्यानंतर कारमध्ये किराणा मालाशेजारी ठेवलेल्या कापडी पिशवीतील सत्तर हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांनी केली आहे.

Car window smashed and ₹70,000 stolen in Lasalgaon.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

5 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

5 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

5 hours ago