नाशिक

विनानंबर मोटारसायकल तपासणीत अपहाराचा गुन्हा उघड; आरोपी जेरबंद

सिडको : विशेष प्रतिनिधी
गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने राबविलेल्या अचानक मोटारसायकल तपासणी मोहिमेत मोटारसायकल अपहाराचा गुन्हा उघडकीस आणत एक लाख 20 हजार रुपये किमतीची यामाहा एमटी मॉडेलची मोटारसायकल जप्त केली आहे. एका संशयिताला अटक केली आहे.
शहरात मोटारसायकल तपासणी मोहिमेदरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी व कर्मचारी इंदिरानगर आणि अंबड पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना हॉटेल सोनाली मटण-भाकरीसमोर सार्वजनिक रस्त्यावर विनानंबर प्लेट असलेल्या मोटारसायकलवर एक संशयित व्यक्ती उभी असल्याचे आढळले. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.
या चौकशीत त्याची ओळख धनराज जितेंद्र लहासे (वय 27, रा. पूर्णानाल, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) अशी पटली. मोटारसायकलच्या कागदपत्रांबाबत समाधानकारक माहिती न दिल्याने अधिक चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने ओएलएक्स संकेतस्थळावरील जाहिरात पाहून छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन मोटारसायकलची ट्रायल घेण्याच्या बहाण्याने ती नाशिकला आणल्याची कबुली दिली.
मोटारसायकलच्या चेसिस क्रमांकाची पडताळणी केली असता वाळूज पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहारप्रकरणी दाखल गुन्ह्यातील ही मोटारसायकल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपीच्या ताब्यातून एक लाख वीस हजार रुपये किमतीची यामाहा एमटी मोटारसायकल जप्त करण्यात आली. आरोपीच्या कबुलीजबाबामुळे वाळूज पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी वाळूज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई सपोनि हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), सपोनि डॉ. समाधान हिरे, पोहवा अतुल पाटील, मनोज परदेशी, प्रदीप नन्नवरे, वाल्मीक चव्हाण, पोलिस अंमलदार प्रवीण वानखेडे आणि जितेंद्र वजिरे यांनी केली.

Case of misappropriation uncovered during inspection of a motorcycle without a registration number; accused arrested.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago