नाशिक

विवाहितेशी लावले लग्न; उपवराची तीन लाखांची फसवणूक

दिंडोरी : प्रतिनिधी
विवाहेच्छू तरुणांना जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करणार्‍या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका 24 वर्षीय शेतकरी युवकाचा नाशिक जिल्ह्यातील वणी येथील मंदिरात एका विवाहित महिलेशी खोटे लग्न लावून तब्बल तीन लाखांंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोलापूरच्या मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा वणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. मुख्य संशयित महिलेला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल जयवंत धावणे (वय 24, रा. नरखेड, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हा तरुण वधूच्या शोधात होता. यादरम्यान तो सोलापूरमधील एका एजंटच्या संपर्कात आला. त्या एजंटने नाशिकच्या एजंटशी संपर्क साधून विशालसाठी मुलगी ठरवली. संबंधित महिला आधीच विवाहित आणि तीन मुलांची आई असतानाही ती अविवाहित असल्याचे भासवून नऊ जणांच्या टोळीने विशालच्या फसवणुकीचा कट रचला. 7 जून 2026 रोजी दिंडोरी तालुक्यातील वणी येथील एका मंदिरात हा विवाह पार पडला. या व्यवहारापोटी विशालकडून एका संशयित एजंटला पन्नास हजार रुपये आणि वधूच्या कथित वडिलांना दोन लाख 50 हजार रुपये, असा एकूण तीन लाख रुपयांचा ऐवज उकळण्यात आला.
विवाह सोहळा आटोपल्यानंतर विशाल, नवरी मुलगी आणि इतर लोक एका वाहनाने निघाले होते. वाटेत वाहन थांबले असता एका संशयिताने वधूला खाली उतरण्यास सांगितले आणि त्यानंतर ती अचानक लपून बसली. संशय आल्याने विशाल आणि त्याच्यासोबतच्या साक्षीदारांनी चौकशी केली असता, सदर महिलेचे आधीच लग्न झालेले असून, तिला तीन मुले असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विशाल साक्षीदारांसह निघून गेला. मात्र, एका विना क्रमांकाच्या स्विफ्ट कारने त्यांच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांना धमकावण्याचाही प्रयत्न केला. विना क्रमांकाच्या स्विफ्ट कारमधील दोन अनोळखी पुरुष. या टोळीने अशाच प्रकारे आणखी काहींना फसविल्याची दाट शक्यता आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. नागरिकांनी विवाह जुळवताना वधू किंवा वराची कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमी पूर्णपणे तपासूनच निर्णय घ्यावा, जेणेकरून अशा फसवणुकीला बळी पडणार नाही, असे आवाहन वणी पोलिसांनी केले आहे.

Man swindled of ₹3 lakh after marrying a woman who was already married.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

14 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

14 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

14 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

14 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago