नागरिकांची कामे खोळंबणार
पंचवटी : प्रतिनिधी
मोटार परिवहन विभाग (आरटीओ) कर्मचार्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असणार्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी मोटार परिवहन विभागाच्या कर्मचार्यांनी राज्यभर एकदिवसीय लाक्षणिक संप मंगळवार, दि. 9 रोजी पुकारला होता. दरम्यान, मागण्यांवर कुठल्याही प्रकारे तोडगा न निघाल्याने आज, दि.16 जूनपासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती मोटार परिवहन विभाग कर्मचारी संघटनेचे नाशिक शहराध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर यांनी दिली.
राज्यभरातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी गेल्या वर्षभराहून अधिक कालावधी प्रलंबित मागण्यांबाबत न्याय मिळेल, या प्रतीक्षेत होते. त्यासाठी कर्मचार्यांनी वेळोवेळी आंदोलनात्मक कृती करून रास्त प्रलंबित मागण्यांसाठी लोकशाही पद्धतीने प्रयत्न केले. त्याबाबत दि. 17 एप्रिल 2026 रोजीच्या पत्राद्वारे तात्पुरत्या पदोन्नतीस मुदतवाढ मिळण्याबाबत कर्मचार्यांच्या भावना कळविल्या होत्या.
दि. 23 सप्टेंबर 2022 रोजी मोटार वाहन विभागाचा आकृतीबंध मंजूर करून लागू करण्यात आला. तद्नंतर कर्मचारी संघटनेने वारंवार प्रत्यक्ष भेटून लिपिक वर्गीय कर्मचार्यांचे सेवाप्रवेश नियम तयार करून घेण्याकरिता विनंती केली आहे, परंतु साडेचार वर्षे होऊनदेखील सेवाप्रवेश नियम अनिर्णित आहेत. सेवाप्रवेश नियमाच्या अनुपलब्धतेचे कारण देऊन कर्मचार्यांना पदोन्नती देता येणार नाही, असे धोरण ठेवल्याने कर्मचार्यांचे आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठेचे नुकसान झाले आहे. यासाठी संघटनेने आक्षेप घेऊन वारंवार निवेदने दिली. या जाचक परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 24 ते 26 सप्टेंबर 2024 या कालावधीत संप आंदोलन राज्यभरात छेडण्यात आले होते. संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयाने लवकरात लवकर सेवाप्रवेश नियम व पदोन्नतीवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची कार्यवाही न झाल्याने दि. 27 ऑक्टोबर 2025 रोजी परिवहन आयुक्त कार्यालय यांचे आवारात साखळी उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर राज्यातील परिवहन विभागातील उपलेखापाल कनिष्ठ/लेखापरीक्षक / मुख्य लिपिक (ग्रामीण)/तसेच वरिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत कर्मचार्यांना कार्यालयीन अधीक्षक या पदावर तीन महिन्यांची तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना देऊन दिलासा देण्यात आला होता. पण तीन महिन्यांचा कालावधी संपताक्षणीच पदोन्नती धारकांना पदावनत करण्यात आले आहे. याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले पदोन्नतीबाबतचे निर्देशही पाळले गेले नाही. याबाबत प्रशासनाशी सलोखा सुसंवाद ठेवून प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा होती. पण आमच्या सर्वच मागण्यांबाबत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी त्यांची नाराजी व्यक्त करण्यासाठी दि. 9 जून रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता. प्रशासकीय स्तरावर सुटू शकणार्या या मागण्यांवर केवळ मार्गदर्शनाचे कारण पुढे करत प्रस्ताव शासनाकडे पाठवून वेळखाऊ धोरण राबवले जात असल्याचा आरोप मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या कर्मचार्यांनी केला आहे.
संघटना आणि परिवहनमंत्री सरनाईक यांच्यात दहा दिवसांपूर्वी यावर बैठक झाली. मात्र, यावेळी प्रशासनाकडून इतिवृत्त देण्यासही टाळाटाळ केली. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे 13 जून रोजी झालेल्या संघटनेच्या बैठकीत बेमुदत संपाचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले. प्रशासनाच्या चालढकल वृत्तीमुळे राज्यातील सर्व आरटीओ कर्मचारी संतप्त असून, प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा कर्मचारी मागे हटणार नाहीत, अशी भूमिका सरतापे यांनी मांडली. परिवहन विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे दि. 16 जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेचे घेतला आहे.
ही कामे थांबणार
♦ वाहन हस्तांतरण कामकाज
♦ वाहनावर असलेला बँकेचा बोजा चढवणे व उतरवणे
♦ परमिट नूतनीकरण
♦ पंधरा वर्षांवरील पुढील वाहनांच्या पासिंगचे काम
♦ आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट
♦ व्यावसायिक वाहनांचा कर भरणे
RTO employees on indefinite strike from today over pending demands.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…