नाशिक

पत्नीसह भोंदूबाबा कमलेश अधिकारीवर गुन्हा दाखल

अघोरी पूजा, भीती दाखवून शोषण केल्याचा प्रकार

नाशिक : प्रतिनिधी
दैवी तोडगे, अघोरी पूजाविधी आणि मृत्यूची भीती दाखवून आर्थिक व मानसिक शोषण केल्याप्रकरणी नाशिकमधील कथित भोंदूबाबा कमलेश महाराज अधिकारी व त्याची पत्नी गौरी अधिकारी यांच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नांतून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडितांकडून दीड लाख रुपये उकळणे, अघोरी पूजाविधी, जबरदस्तीने आश्रमात ठेवणे आणि दोन एकर जमीन नावावर करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील लऊळ येथील मदन नवनाथ देवकर आणि ज्ञानेश्वर नवनाथ देवकर या दोघांच्या आई-वडिलांचे 2021 मध्ये अल्पावधीत निधन झाले होते. या घटनेनंतर भीतीच्या वातावरणात असलेल्या दोघा भावांनी दैवी उपायांच्या शोधात असताना यूट्यूबवरून नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील खंडोबानगर येथील कमलेश अधिकारी याच्याशी संपर्क साधला.
आरोपानुसार, कमलेश अधिकारी याने त्यांच्या कुटुंबावर मागील जन्माचे पाप, जमिनीवरील दैवी दोष, गुप्तधन व अतृप्त आत्म्यांचा प्रभाव असल्याचे सांगून दोघा भावांना मृत्यूची भीती घातली. त्यानंतर दैवी उपचारांच्या नावाखाली त्यांचा विश्वास संपादन करत उज्जैन येथे बोलावून स्मशानभूमीत चार दिवस अघोरी पूजाविधी करण्यात आल्याचा आरोप आहे. या विधींमध्ये पशुबळी दिला गेला आणि पीडितांकडून सुमारे दीड लाख रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नांदगाव तालुक्यातील पिंपळखेड येथील आश्रमात पुन्हा अघोरी पूजा करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात पीडितांना बळजबरीने ठेवून घरगुती कामे करून घेतल्याचा आरोप आहे. भीती आणि आमिष दाखवत त्यांचे विविध प्रकारे शोषण करण्यात आले. मठ उभारणीच्या नावाखाली त्यांची दोन एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारात कमलेश अधिकारी याची पत्नी गौरी अधिकारी हिचाही सहभाग असल्याचे समोर
आले आहे.
पीडितांनी नंतर नाशिकमधील ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. ‘अंनिस’च्या पदाधिकार्‍यांनी पीडितांना घेऊन इंदिरानगर पोलीस ठाणे गाठत संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी प्रकरण गांभीर्याने घेत जादूटोणाविरोधी कायद्यातील कलम 2(1)(ख) तसेच बीएनएसच्या विविध कलमांन्वये कमलेश अधिकारी व गौरी अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराज शिरसाठ करीत आहेत. दरम्यान, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या अन्य नागरिकांनी अंनिस किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘अंनिस’कडून करण्यात आले आहे.

Case registered against Bhondubaba Kamlesh Adhikari along with his wife

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

थोर तत्त्वज्ञ : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…

2 days ago

शांघाय परिषदेचे फलित

किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…

2 days ago

शहर अस्वच्छ करणार्‍यांचा शोध

घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…

2 days ago

खडकाळ जमिनीत शिक्षकांनी रुजविली हिरवाई

शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…

2 days ago

अघोषित भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त!

दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…

2 days ago

माध्यमिक शिक्षणाला मिळणार बळ

708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…

2 days ago