सिडको : प्रतिनिधी
इंदिरानगर परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 70 वर्षीय वृद्धाला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत तीन वर्षे साधा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.
त्र्यंबक शंकर गवळी (रा. मोंढेवाडी, गौळाणा रोड, पाथर्डी शिवार) असे दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. जानेवारी 2021 मध्ये पीडित मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर आरोपीने तिला घरातील दूरचित्रवाणी संच सुरू करून देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. मुलगी दूरचित्रवाणी सुरू करत असताना आरोपीने घराचा दरवाजा बंद करून तिचा विनयभंग केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एन. ओ. सय्यद यांनी केला. त्यांनी आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करून जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांच्या साक्षी तसेच तपासातील परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्ती के. के. पाटील यांनी आरोपीला शिक्षा
सुनावली.
Molestation of minor girl; Old man gets three years in prison
आयुष्याचा सूर्यास्त होण्याआधी कित्येक वर्षे जी माणसे आपल्या आयुष्याच्या पवित्र समिधा आयुष्यभर राष्ट्र उद्धाराच्या अग्निकुंडात…
किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडलेल्या शांघाय सहकार्य…
घनकचरा विभागाचे पथक तैनात नाशिक : प्रतिनिधी वाढत्या बांधकाम क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व पाडकामातून निर्माण…
शहा विद्यालयाच्या सहा एकर परिसरात 850 हून अधिक वृक्ष सिन्नर : प्रतिनिधी फळ्यावर अक्षरे गिरविणारे…
दिवसा वीज मिळेना, रात्री अंधारामुळे बिबट्याची भीती; दुग्ध व्यवसायालाही फटका सिन्नर : प्रतिनिधी ग्रामीण भागात…
708 शिक्षकांची होणार भरती; पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त…