नाशिक

विक्रम रंधवेंसह पाच जणांवर गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा; नगरपंचायत कर्मचार्‍यांचे धरणे आंदोलन

निफाड : तालुका प्रतिनिधी
निफाड शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करताना कुत्र्यांना प्लास्टिकच्या गोणीत टाकून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या टेबलावर सोडणे, तसेच पैशांचा हार टेबलावर ठेवून आरडाओरड व दमदाटी केल्याप्रकरणी शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम नामदेव रंधवे यांच्यासह पाच जणांविरुद्ध निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुख्याधिकारी धीरज भामरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विक्रम नामदेव रंधवे, रूपाली विक्रम रंधवे, बिरजू पठाण, सुनील पाठक आणि रतन गाजरे यांचा आरोपी म्हणून समावेश आहे. निफाड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी विक्रम रंधवे यांनी नगरपंचायतीकडे मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर संबंधितांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन मुख्याधिकार्‍यांच्या टेबलावर कुत्रे सोडल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ नगरपंचायत कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून एकदिवसीय धरणे आंदोलन केले. तसेच निफाड पोलिस ठाण्यात निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनल पडोळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आंदोलनात रामदास कराटे, किरण माळी, मनोज ढकोलिया, प्रकाश पवार, जालिंदर पवार, जयसिंग ठाकरे, आर. सी. भवर, शरद काकुळते, नरेश धारराव, सुनील मोरे, सुनील गांगुर्डे, अनिल कुंदे, नितीन तांबे, शरद बोडके, दिनेश सोनवणे, रतन खालकर, मुकुंद शिंदे, योगेश कांदळकर, नीलेश ठाकूर, गौरव मोरे, मनोज कुंभार, विनोद चिंतामणी, विपुल सेंद्रे, राहुल लामखेडे, सिद्धार्थ जगताप, सुनील माळी, मयुरी नवले आदी कर्मचारी उपस्थित होते.

Case registered against five people, including Vikram Randhave.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

11 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

11 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

11 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

11 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

11 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

11 hours ago