इंदिरानगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या
इंदिरानगर : वार्ताहर
दिवसा केटरिंगचे काम करून रात्री रस्त्यावरील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणार्या एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. सलमान छंगा खान (वय 30) असे या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.20 सप्टेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट- 2 चे मनोज परदेशी आणि अतुल पाटील यांना त्यांच्या एका विश्वासू खबर्याकडून पक्की माहिती मिळाली की, आर्यन केटरर्स येथे कामाला असलेला सलमान नावाचा तरुण चोरीची सोनसाखळी विकण्याच्या प्रयत्नात विनयनगर येथे थांबला आहे. ही माहिती मिळताच, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागण्याआधीच पथकाने अत्यंत शिताफीने सलमानला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी सलमानला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या एका दिवसातच गुन्हेशोध पथकाने आपल्या बुद्धिकौशल्याचा आणि तपासाच्या अनोख्या शैलीचा वापर केला. त्यांनी आरोपीला विश्वासात घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली असता, त्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी दोन सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्या अटकेमुळे तब्बल तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून तीन लाख 13 हजार 950 रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे.
ही कामगिरी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पोउनि संतोष फुंदे आणि त्यांच्या टीममधील अमजद पटेल, पवन परदेशी, सागर परदेशी,योगेश जाधव, दिपक शिंदे, सौरभ माळी, सागर कोळी, अमोल कोथमिरे, जयलाल राठोड व प्रमोद कासुदे यांनी पार पाडली.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…