नामकोच्या महिला डॉक्टरांनी मागितली तीस हजारांची लाच

नामकोच्या महिला डॉक्टरांनी
मागितली तीस हजारांची लाच
लाचलुचपतच्या पथकाकडून गुन्हा दाखल
नाशिक: प्रतिनिधी

शस्रक्रिया झालेली असतानाही महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून रुग्णाकडे तीस हजार रुपये लाचेची मागणी करून त्यामोबदलात एकदा 9 हजार व दुसऱ्यांदा 11 हजार स्वीकारणाऱ्या नामको कॅन्सर रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. विशाखा जहागीरदार, कॅशियर महिला कर्मचारी व गायत्री सोमवंशी अशा तिघीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदार हे दारिद्र्य रेषेखालील असून, त्यांच्याकडे पिवळे रेशनकार्ड आहे. तक्रारदार यांची पत्नी या रुग्णालयात दाखल होत्या, महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यासाठी नामको च्या डॉक्टरानी दिनांक 3 एप्रिल रोजी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 9 हजार स्वीकारले. तर 7 एप्रिल रोजी 21 हजारांची मागणी करून त्यापैकी11 हजार रुपये स्वीकारले म्हणून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक स्वाती पवार, हवालदार शरद हेमबाडे, युवराज खांडवी, राजश्री अहिरराव, परशराम जाधव यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago