नाशिक

देशवंडीत ‘जलकवच’ प्रकल्पातून सिमेंट नाला बांध

2 कोटी 50 लाख लिटर अतिरिक्त पाणी साठवण क्षमता

सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे ग्लेनमार्क फाउंडेशन यांच्या सहकार्याने युवा मित्र संस्थेने ‘जलकवच’ प्रकल्पांतर्गत सिमेंट नाला बांध उभारला असून, नाल्यातील सुमारे 20 हजार घनमीटर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. या कामांमुळे परिसरात 2 कोटी 50 लाख लिटर अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली असून, भूजल पुनर्भरणाला मोठी चालना मिळणार आहे. युवा मित्रच्या संचालक मनीषा पोटे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
या प्रकल्पामुळे सुमारे 350 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून, 75 बोअरवेल व खुल्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होईल. त्यामुळे 135 शेतकर्‍यांना अधिक सुरक्षित व शाश्वत पाणी उपलब्ध होऊन त्यांच्या शेतीसह उपजीविकेलाही बळ मिळणार आहे.
जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागाची जलसुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा शाश्वत वापर यासाठी अशा प्रकल्पांची गरज अधोरेखित होत असून, आज जपलेला प्रत्येक थेंब उद्याच्या जलसुरक्षित आणि समृद्ध ग्रामीण भविष्याची पायाभरणी करतो, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

350 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा आधार
75 विहिरी व बोअरवेलचे भूजल पुनर्भरण
135 शेतकर्‍यांना थेट लाभ

 

Cement drain dam built in Deshwandi through ‘Jalkavach’ project

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील पोत हिसकावली

सिडको : प्रतिनिधी जेवण झाल्यानंतर घरासमोर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या 72 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची…

1 minute ago

मालेगावात प्रतिबंधित औषधांचा साठा जप्त

तिघांना अटक; 67 हजार अल्प्राझोलम गोळ्या, कोडीन सिरप मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव पोलिसांनी अमली पदार्थ…

8 minutes ago

तरुणाचा आयफोनचा हट्ट; संभाजीनगरात संपले कुटुंब!

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज-तीसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर एका अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक…

13 minutes ago

राज्यातील पोलीस ठाण्यांच्या रचनेत मोठे बदल

सध्याचे मनुष्यबळ 1960 च्या निकषांवर आधारित; गुन्ह्यांच्या संख्येनुसार पोलीस ठाण्याचा गट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील…

24 minutes ago

‘पॅलेट गन’प्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला यश नवी दिल्ली : प्रतिनिधी ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात आंदोलन…

36 minutes ago

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

21 hours ago