नाशिक

वडगाव-पिंगळा-चिंचोली मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात

भूसंपादनाचा तिढा सुटेपर्यंत किमान डागडुजी करा

सिन्नर : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येत असलेल्या राज्यमार्ग क्रमांक 37 च्या भूसंपादन मोबदल्याचा प्रश्न अद्याप निकाली न निघाल्याने नवीन मार्गाचे काम रखडले आहे. त्याचा फटका वडगाव पिंगळा, चिंचोली या जुन्या मार्गाचा वापर करणार्‍या नागरिकांना बसत असून, दुरुस्तीअभावी संपूर्ण रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि परिसरातील गावांतील नागरिकांचा प्रवास धोकादायक बनला आहे.
राज्यमार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने किमान तात्पुरती डागडुजी करून खड्डे बुजवावेत, अन्यथा नाशिक-पुणे महामार्गावरील चिंचोली फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वडगाव पिंगळा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका हुळहुळे, सामाजिक कार्यकर्ते अजय हुळहुळे तसेच ग्रामस्थांनी दिला आहे.
या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून काही ठिकाणी त्यांची खोली अर्धा फूटपर्यंत पोहोचली आहे. परिणामी वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून अपघातांचे प्रमाणही वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

Vadgaon-Pingla-Chincholi road riddled with potholes.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago