नाशिक

दोन वर्षांतच कोट्यवधींचा रस्ता खड्ड्यात

पावसाने वाढवली दुरवस्था; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

सिन्नर : प्रतिनिधी
कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला सिन्नर शहराबाहेरील देवी रोड-आयटीआय-नायगाव हा महत्त्वाचा रस्ता अवघ्या दोन वर्षांतच खड्डेमय झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी डांबर उखडून रस्ता खचल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून, पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. त्यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सिन्नर शहरासह परिसरातील अनेक गावांना जोडणार्‍या या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि मालवाहू वाहने प्रवास करतात. मात्र, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावली असून दुचाकीस्वारांना अक्षरशः कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांचा अंदाज न आल्याने घसरून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. रात्री अपुर्‍या प्रकाशामुळे अपघाताचा धोका आणखी वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुरुस्तीवर अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी तसेच अत्यावश्यक सेवांसाठी प्रवास करणार्‍यांनाही रोजच या समस्येचा सामना करावा लागत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नगर परिषदेने केवळ खड्डे बुजविण्यापुरती मलमपट्टी न करता संपूर्ण रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी.
तसेच कामाची गुणवत्ता तपासून संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

रस्त्याची तातडीने दुरुस्ती करू

नागरिकांच्या सोयीसाठी अंदाजपत्रकापेक्षा अधिक लांबीचा रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्याचा दुरुस्ती कालावधी संपला असून नगरपालिकेच्या माध्यमातून तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता सौरभ गायकवाड यांनी दिली.

 

Road worth crores riddled with potholes within just two years.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

20 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

20 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

20 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

20 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

20 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

21 hours ago