दहावी परीक्षेच्या नियमांचे केंद्र संचालक, पर्यवेक्षकांनी पालन करावे : डॉ. बोरसे

नाशिक : प्रतिनिधी

दहावीची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत असून, नियमानुसार मंडळाच्या सूचनांनुसार केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, दालन पर्यवेक्षक यांनी पालन करावे, असे आवाहन नाशिक विभागीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे यांनी केले. नाशिक येथील विभागीय मंडळाच्या हॉलमध्ये नाशिक जिल्ह्यातील दहावी व बारावी केंद्र संचालकांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.
शालांत उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले असून, यासंदर्भात सर्व केंद्र संचालकांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून विद्यार्थ्यांना भयमुक्त परीक्षा देण्याकरिता प्रोत्साहन देण्याचे आवाहन नाशिक विभागीय परीक्षा मंडळाचे सचिव मोहन देसले यांनी केले. सहसचिव डॉ. मच्छिंद्र कदम यांनी परीक्षा पूर्व, परीक्षाकालीन व परीक्षोत्तर कामाचे नियोजन, स्टाफ नियुक्ती, दिव्यांग विद्यार्थी सवलती, दालन पर्यवेक्षक सभा, जनरेटर, बॅचेस, पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, फॅन, इतर सुविधा पूर्तता करून घ्यावी. जिल्हा दक्षता समितीच्या जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार कार्यवाहीबाबत सूचना दिल्या. भरारी पथकाचे अधिकारी यांनी कॉपी केस केल्यास त्याबाबतची कार्यवाही, डमी किंवा तोतया विद्यार्थी, अनुपस्थित, ऐनवेळी प्रविष्ट विद्यार्थी, विद्यार्थी कॉपी, साहित्य, इलेक्ट्रॉनिक गॅझेट न आणण्याबद्दल माहिती दिली. शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रशांत दिग्रसकर यांनीही मार्गदर्शन केले. व्यासपीठावर उपशिक्षणाधिकारी प्रकाश आहिरे, उपशिक्षणाधिकारी आकुस्कर, संजय बोरसे, शशिकांत चौधरी, सर्व केंद्र संचालक यांचे सहाय्यक सचिव रूपाली पाटील यांनी आभार मानले.

कॉपीरहित परीक्षा होण्यास मदत

विभागीय सचिव मोहन देसले यांनी मंडळ शिक्षासूची वाचन केल्याचे, कॉपी न करण्याची प्रतिज्ञा घेतल्याने मंडळाने तयार केलेला व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवा, यामुळे कॉपीरहित परीक्षा होण्यास मदत होईल. मंडळ सूचनांचे पालन करा याबाबत मार्गदर्शन केले. चुका टाळण्यासाठी पर्यवेक्षकांना सूचना द्या, बैठक घ्यावी, हमीपत्र भरून जबाबदारीची जाणीव करून द्यावी म्हणजे कॉपीविरहित वातावरणात परीक्षा होईल. केंद्र संचालक म्हणून आपल्यावर आता मोठी जबाबदारी आहे, ती व्यवस्थित पार पाडावी, मंडळाने दिलेल्या केंद्र संचालक पुस्तिकेतील पडताळा सूचीनुसार कामाचे नियोजन करून कार्यवाही करावी, असे सहसचिव डॉ. मच्छिंद्र कदम यांनी सांगितले.

Center directors and supervisors should follow the rules of 10th exam: Dr. Borse

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *