मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटे जागीच थांबल्या उल्हासनगर : रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरचा विषय झाल्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. उल्हासनगर स्थानकात पादचारी पुलाचे काम सुरू असताना ओव्हरहेड वायरवर पुलाच्या कामाची वायर पडली.मुंबईकरांसाठी महत्वाची असलेली मध्य रेल्वेची सेवा गुरुवारी पुन्हा विस्कळीत झाली. गुरुवारी दुपारी मध्य रेल्वेच्या लोकल 15 ते 20 मिनिटे जागीच थांबल्या. उल्हासनगर रेल्वे स्थानक येथे असणारी ओव्हरहेड वायर काही काळ बंद करण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे सेवेचा खोळंबा झाला. काही काळानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली. परंतु सध्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत.मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा उशिराने सुरु आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरचा विषय झाल्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम झाला. उल्हासनगर स्थानकात पादचारी पुलाचे काम सुरू असताना ओव्हरहेड वायरवर पुलाच्या कामाची वायर पडली. त्यामुळे ठिणग्या उडाल्या. धोका लक्षात घेऊन स्टेशन मास्तरांनी तत्परतेने ओव्हर हेड वायर काही काळ बंद केली. त्यामुळे लोकल्स 15 ते 20 मिनिटे जागीच थांबल्या होत्या. काही वेळाने रेल्वे सेवा उशिराने सुरू झाली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार 31 जुलैपर्यंत विशेष मोहीम निफाड : विशेष प्रतिनिधी निफाड तालुक्यात शाळाबाह्य मुलांचा…
जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम लासलगाव : समीर पठाण मे महिन्यात झालेल्या…
र्गा भागवत यांचा जन्म इंदूर शहरात 10 फेब्रुवारी 1910 रोजी झाला. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान…
षाढातील कोसळणार्या पाऊसधारा, कुरकुरीत कांदे भज्यांसोबत रंगणार्या गप्पा, अशी छान मैफल कांदेनवमीला रंगत जाते. खवय्यांच्या…
नाशिक : प्रतिनिधी गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे.…
शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का; बागूल, राजवाडेंचा प्रवेश लांबणीवर नाशिक :…