चांदोरीजवळ शिवशाहीला आग

नाशिक : प्रतिनिधी

निफाड तालुक्यातील चांदोरी नजीक शिंपी टाकळी फाटा येथे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर आज दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारासधावत्या शिवशाही बसला भीषण आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत बस मधील 25 प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर शिंपीटाकळी फाटा येथे ही दुर्घटना घडली, शिवशाही बस क्रमांक एम एच ०९, एफ एल ०४७७ ही बस नाशिकहून छत्रपती संभाजी नगर कडे जात असताना आज दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास धावत्या बस मध्ये इंजिनच्या बाजूने दूर निघत असल्याचे चालकाच्या काच्या लक्षात आले, वाहकाने तत्काळ सदरची बस थांबून सतर्कतेने बस मधील अंदाजे 25 te 26 बसलेले प्रवासी खाली उतरून दिले, त्यानंतर काही क्षणातच बसने मोठ्या स्वरूपात पेट घेतला व या आगीत ही संपूर्ण बस भक्षस्थानी पडली, सदरच्या घटनेमुळे नाशिक ते छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प झाली, मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकातील आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर गडाख, सोमनाथ कोटमे,भाऊ कर्डिले किरण वाघ, सुरज पगारे,सचिन कांबळे, नीलेश नाठे, गोकुळ टर्ले घटनास्थळी उपस्थित होते
व स्थानिक नागरिकांनी यावेळी आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले,. दरम्यान या घटनेत सर्व प्रवासी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

14 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

14 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

15 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

15 hours ago