नाशिक

सिटीलिंकच्या वाहतूक मार्गात बदल

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीचा केंद्रबिंदू असलेल्या द्वारका सर्कल परिसरात अंडरपासचे काम सुरू करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर द्वारकामार्गे जाणार्‍या सिटीलिंक बसेसच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यात नाशिकरोड ते निमाणी दरम्यान जाणार्‍या बसेसचा मार्ग- नाशिकरोड, विजय-ममता सिग्नल, अशोका मार्ग, आम्रपाली टॉवर, कल्पतरूनगर, अशोका शाळा, लक्ष्मी माता चौक, भारतनगर, सह्याद्री हॉस्पिटल, आयेशानगर, मुंबई नाका, उर्दू शाळा, सारडा सर्कल, गंजमाळ, शालिमार, सीबीएस, रविवार कारंजा, पंचवटी कारंजामार्गे निमाणी.
निमाणी ते नाशिकरोड दरम्यान जाणार्‍या बसेसचा मार्ग- निमाणी, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, शालिमार, सारडा सर्कल, उर्दू शाळा, जिल्हा उपनिबंधक, कोर्ट यार्ड, वाणी हाउस, आयेशानगर, भारतनगर, लक्ष्मी नारायण चौक, अशोका मार्ग, विजय ममता सिग्नल, आंबेडकरनगरमार्गे नाशिकरोड.
दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या काही बसेस निमाणी बसस्थानक येथून मार्गस्थ होणार असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने सिटीलिंकच्या निमाणी बसस्थानक येथून सुटणार्‍या सर्व बसेस तपोवन डेपो येथून मार्गस्थ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार रविवार (दि.1) पासून निमाणी येथून सुटणार्‍या सर्व बसेस तपोवन बस डेपो येथून सुटणार आहे. तसेच निमाणी परिसरात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निमाणी येथे सिटीलिंकची कोणतीही बस थांबणार नाही. सदर बसेस पंचवटी डेपो कॉर्नर नंतर थेट पंचवटी कारंजा किंवा पंचवटी कारंजा नंतर थेट पंचवटी डेपो कॉर्नर अशी थांबेल. निमाणी येथून सुटणार्‍या सिटीलिंकच्या बसेस स्थलांतरित केल्या जाणार असल्या, तरी प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरिता निमाणी बसस्थानक येथील पास केंद्रात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ज्या प्रवाशांना निमाणी बसस्थानक येथून पास काढावयाचा आहे ते निमाणी बसस्थानक येथूनच पास काढू शकतात. प्रवाशांना याबाबत कोणतीही अधिकची माहिती हवी असल्यास कृपया 8530057222, 8530067222 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Changes in Citylink transport routes

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago