नाशिक

भाजप गटनेत्यांकडून महापौर, उपमहापौर अर्ज खरेदी

मंगळवारपर्यंत अखेरची मुदत

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाची निवड दि. 6 फेब्रुवारीला महासभेत केली जाणार आहे. प्रशासनाने या संदर्भातील कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 3 फेब्रुवारी) अर्ज सादर करण्याची अखेरची मुदत आहे. शुक्रवारी (दि.30) भाजप गटनेते अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांचे अर्ज खरेदी केले.
महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीचा विभागीय आयुक्तांनी कार्यक्रम निश्चित केला आहे. नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीत भाजप व शिंदेसेना स्वबळावर लढली. यात भाजपने सर्वाधिक 72 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. शिंदेसेनेला अवघ्या 26 जागा वाट्याला आल्या. भाजप, उद्धवसेना, काँग्रेस व शिंदेसेनेने शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पक्षाची गटनोंदणी केली. भाजपने नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. शिंदेसेनेने अजय बोरस्ते, उद्धवसेनेने केशव पोरजे यांची गटनेतेपदी निवड केली आहे. काँग्रेसचे सूफी जीन गटनेतेपदी आहेत. राज्याच्या नगरसचिव विभागाने महापौर निवडीचा कार्यक्रम निश्चित करत 6 फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत महापौरपदासाठी अर्ज विक्री व अर्ज स्वीकारण्यासाठी मुदत आहे.

भाजपच्या नगरसेविकेकडूनही अर्ज खरेदी

दरम्यान, एकीकडे भाजपचे गटनेते अ‍ॅड. श्याम बडोदे यांनी महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांचे अर्ज खरेदी केले असताना, दुसरीकडे मात्र पंचवटीतील भाजपच्याच एका नगरसेविकेनेदेखील दोन्ही पदांचे अर्ज नेले आहेत. भाजपमध्ये स्वतंत्र अर्ज घेण्यामागचे कारण काय? यावरून चर्चा होते आहे.

Purchase of Mayor, Deputy Mayor applications from BJP group leaders

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago