गर्डरच्या कामासाठी पिंपळगाव बहुला पूल चार दिवस बंद
नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मार्गावरील पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीवरील पुलाचा गर्डर टाकण्याच्या कामासाठी दि. 24 ते 27 नोव्हेंबरदरम्यान वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या चार दिवसांत ठरावीक वेळेत पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक- त्र्यंबकेश्वर मार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. याबाबत पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.
पिंपळगाव बहुला येथील नंदिनी नदीच्या पुलाच्या उजव्या बाजूच्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामादरम्यान पुलावरून होणारी वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणारी वाहतूक पिंपळगाव बहुला जकात नाका येथे, तर नाशिककडून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूक पिंपळगाव बहुला बसस्थानक येथे बंद करण्यात येईल.
त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे येणार्या वाहनांना महिरावणी येथे वळवून गिरणारेमार्गे नाशिकला यावे लागेल. नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाणार्या वाहनांना अमृत चौकातून अशोकनगर, कार्बन नाका आणि बारदान फाटामार्गे जावे लागणार
आहे.
या पुलाच्या परिसरात बॅरिकेडिंग करणे, प्रवेशबंद, काम सुरू आहे, पर्यायी मार्ग, सावकाश जा आदी सूचना फलक लावणे ठेकेदाराला बंधनकारक करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळीही हे फलक स्पष्ट दिसावेत यासाठी रेडियमचा वापर करण्याच्या सूचना आहेत. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक ठिकाणी कर्मचारी नियुक्त करावे लागणार आहेत.
चार दिवसांचे वेळापत्रक
दिनांक वाहतूक बंदची वेळ
24 नोव्हेंबर पहाटे 5 ते 6, दुपारी 1 ते 2, 3.30 ते 4.30
25 नोव्हेंबर पहाटे 5 ते 6, दुपारी 1 ते 2, 3.30 ते 4.30
26 नोव्हेंबर पहाटे 5 ते 6, दुपारी 1 ते 2, 3.30 ते 4.30
27 नोव्हेंबर पहाटे 5 ते 6, दुपारी 1 ते 2, 3.30 ते 4.30
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
त्र्यंबकेश्वर ते नाशिक : महिरावणी-गिरणारे- नाशिक
नाशिक ते त्र्यंबकेश्वर : अमृत चौक- अशोकनगर- कार्बन नाका- बारदान फाटा- त्र्यंबकेश्वर
Changes to traffic on the Trimbakeshwar-Nashik road
गंगापूर रोडवर वाहने चालवणार्यांची पंचाईत नाशिक : प्रतिनिधी आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे रूप पालटत…
67 कोटींचा आराखडा; निर्माल्यापासून खतनिर्मिती, प्लास्टिकमुक्त कुंभमेळ्याचे उद्दिष्ट नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांची…
नाशिक : प्रतिनिधी नाशिककरांचा रविवार म्हणजे मिसळवार! रविवारची सकाळ झाली की, शहरातील मिसळच्या हॉटेल्समध्ये खवय्यांची…
काहींनी नूतनीकरणासाठी तात्पुरत्या बंद ठेवल्या आस्थापना नाशिक : प्रतिनिधी भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा…
नाशिक : प्रतिनिधी राजमुद्रा सोशल फाउंंडेशन, नाशिक यांच्या वतीने आयोजित 10 वा अर्थात दशकपूर्ती दीपोत्सव…
सिन्नर : प्रतिनिधी उसाच्या शेतात कामकाज करताना बिबट्याची चाहूलही लागली नाही आणि अचानक त्याने दोन…