नाशिक

रविवार मिसळवार…पण गर्दीला कारवाईचा फटका

नाशिक : प्रतिनिधी
नाशिककरांचा रविवार म्हणजे मिसळवार! रविवारची सकाळ झाली की, शहरातील मिसळच्या हॉटेल्समध्ये खवय्यांची गर्दी उसळते. कुटुंबीय, मित्रमंडळींसह मिसळचा आस्वाद घेण्यासाठी बाहेर पडणार्‍या नाशिककरांची संख्या मोठी असते. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या अलीकडील कारवाईमुळे मिसळप्रेमींच्या गर्दीवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे रविवारी (दि. 22) शहरातील चित्रातून दिसले. नेहमीच्या तुलनेत काही मिसळ केंद्रांवरील गर्दी कमी असल्याचे चित्र होते.
नाशिकची मिसळ ही केवळ खाद्यसंस्कृती नसून शहराची स्वतंत्र ओळख आहे. रविवारच्या सुटीत सकाळी नाश्ता करण्यासाठी मिसळ केंद्रांवर जाणे, ही अनेक नाशिककरांची आवडती परंपरा आहे. शहरातील प्रसिद्ध मिसळ केंद्रांवर सकाळपासूनच रांगा लागतात. काही ठिकाणी टेबल मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. मात्र, अलीकडे अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत आणि स्वच्छतेबाबत प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे ग्राहकांमध्ये काही प्रमाणात सावधगिरी वाढल्याचे दिसते. अन्न व औषध प्रशासनाकडून विविध खाद्य आस्थापनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे हॉटेलमधील स्वच्छता, खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि वापरल्या जाणार्‍या साहित्याबाबत ग्राहक अधिक जागरूक झाले आहेत. मिसळ खाण्यासाठी बाहेर पडताना कोणत्या हॉटेलमध्ये जायचे, याबाबतही ग्राहक निर्णय घेत असल्याचे चित्र आहे.
नेहमीच्या तुलनेत काही ठिकाणी गर्दी कमी असल्याने कारवाईचा परिणाम खाद्यसंस्कृतीशी जोडलेल्या या व्यवसायावर कितपत होतो, याची चर्चा सुरू झाली आहे.

खाऊगल्ल्यांवर कारवाईकडे लक्ष
’एफडीए’कडून शहरातील बड्या हॉटेलांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र, शहरातील अनेक भागांत असलेल्या खाऊगल्ल्यांवरदेखील अस्वच्छता असल्याचे निदर्शसनास येते. उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करण्याबरोबरच अस्वच्छ वातावरणातच ग्राहक या पदार्थांंवर ताव मारत असल्याचे चित्र शहरातील विविध खाऊगल्ल्यांमध्ये पाहावयास मिळते. तेथील अस्वच्छता डोळ्याने दिसत असूनही एफडीएला अजूनपर्यंत दिसली नाही का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. त्यामुळे या खाऊगल्ल्यांंवर ’एफडीए’कडून कारवाई होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Sunday is ‘Misal’ day… but the crowd faces the brunt of enforcement action

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुंभनगरीच्या स्वच्छतेवर तंत्रज्ञानाची नजर

67 कोटींचा आराखडा; निर्माल्यापासून खतनिर्मिती, प्लास्टिकमुक्त कुंभमेळ्याचे उद्दिष्ट नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्यात लाखो भाविकांची…

2 minutes ago

’एफडीए’च्या धसक्याने अनेक हॉटेल्सचे शटर्स डाउन!

काहींनी नूतनीकरणासाठी तात्पुरत्या बंद ठेवल्या आस्थापना नाशिक : प्रतिनिधी भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा…

19 minutes ago

शिवतीर्थावर ‘सिहस्थ कुंभमेळा’ थीमवरील भव्य दीप सोहळा

नाशिक : प्रतिनिधी राजमुद्रा सोशल फाउंंडेशन, नाशिक यांच्या वतीने आयोजित 10 वा अर्थात दशकपूर्ती दीपोत्सव…

28 minutes ago

उसाच्या शेतात बिबट्याने दोन महिला मजुरांवर झडप घातली.

सिन्नर : प्रतिनिधी उसाच्या शेतात कामकाज करताना बिबट्याची चाहूलही लागली नाही आणि अचानक त्याने दोन…

46 minutes ago

त्र्यंबकेश्वरला भीषण दुष्काळी परिस्थिती

पिके करपली, पशुधनावरही चाराटंचाईचे सावट त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी यंदा त्र्यंबकेश्वर तालुक्यात कागदोपत्री सरासरीपेक्षा जास्त पावसाची…

57 minutes ago

अतिरिक्त उत्पादन; अंदाजाने कांदा उत्पादक धास्तावले

वर्षभर 3 हजार रुपये दराची मागणी; निर्यातीसाठी स्थिर धोरण राबविणे गरजेचे लासलगाव : वार्ताहर कांदा…

1 hour ago