नाशिक

शिवतीर्थावर ‘सिहस्थ कुंभमेळा’ थीमवरील भव्य दीप सोहळा

नाशिक : प्रतिनिधी
राजमुद्रा सोशल फाउंंडेशन, नाशिक यांच्या वतीने आयोजित 10 वा अर्थात दशकपूर्ती दीपोत्सव सोहळा काल रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात झाला. ‘एक पणती शिवरायांसाठी’ या संकल्पनेतून सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (शिवतीर्थ) परिसरात आयोजित या सोहळ्याने नाशिककरांना परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा आगळावेगळा अनुभव दिला.
यंदाच्या दशकपूर्ती दीपोत्सवाचे मुख्य आकर्षण आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेली विशेष दीपमांडणी हे ठरले. हजारो पणत्यांच्या लखलखाटातून सिंहस्थ कुंभमेळ्याची संकल्पना, भारतीय संस्कृती, धार्मिक परंपरा आणि नाशिकच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाचे विलोभनीय दर्शन घडवण्यात आले. हा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी नाशिककरांनी शिवतीर्थावर मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत आयोजित रक्तदान शिबिराने झाली, ज्याला नागरिक व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता मुख्य दीपोत्सवाचा शानदार शुभारंभ झाला. यावेळी भव्य दीपप्रज्वलन, पारंपरिक गोदा आरती, आकर्षक फटाक्यांची आतषबाजी आणि लोकसंगीताच्या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
या दशकपूर्ती सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सरदार विंचूरकर यांचे वंशज, नाशिकचे माजी महापौर व उपमहापौर, नाशिक विभागाचे धर्मादाय मुख्य सहआयुक्त तथा श्री त्र्यंबकेश्वर मंदिर व श्री सप्तशृंगी मंदिर, वणी गडचे अध्यक्ष, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष, प्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर, जिल्हाधिकारी नाशिक, आयुक्त कुंभमेळा प्राधिकरण, शाहू महाराज खैरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी फाउंंडेशनच्या गेल्या दहा वर्षांतील सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे विशेष कौतुक केले.
गेल्या दशकापासून राजमुद्रा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शिवजयंती, जिजाऊ जयंती, शंभूराजे जयंती, वृक्षारोपण आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी, हिंदू धर्माचा प्रसार करणारे मान्यवर तसेच राजमुद्रा सोशल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Grand lamp festival themed around the ‘Simhastha Kumbh Mela’ at Shivteerth

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

’एफडीए’च्या धसक्याने अनेक हॉटेल्सचे शटर्स डाउन!

काहींनी नूतनीकरणासाठी तात्पुरत्या बंद ठेवल्या आस्थापना नाशिक : प्रतिनिधी भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा…

5 minutes ago

उसाच्या शेतात बिबट्याने दोन महिला मजुरांवर झडप घातली.

सिन्नर : प्रतिनिधी उसाच्या शेतात कामकाज करताना बिबट्याची चाहूलही लागली नाही आणि अचानक त्याने दोन…

32 minutes ago

त्र्यंबकेश्वरला भीषण दुष्काळी परिस्थिती

पिके करपली, पशुधनावरही चाराटंचाईचे सावट त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी यंदा त्र्यंबकेश्वर तालुक्यात कागदोपत्री सरासरीपेक्षा जास्त पावसाची…

43 minutes ago

अतिरिक्त उत्पादन; अंदाजाने कांदा उत्पादक धास्तावले

वर्षभर 3 हजार रुपये दराची मागणी; निर्यातीसाठी स्थिर धोरण राबविणे गरजेचे लासलगाव : वार्ताहर कांदा…

49 minutes ago

निफाड हिवाळ्यात का होते थंडा थंडा कूल कूल?

भौगोलिक रचना पाहता तालुका पाण्याचे खोरे असल्याचे तज्ज्ञाचे मत निफाड : तालुका प्रतिनिधी दरवर्षी हिवाळ्यात…

1 hour ago

सप्तशृंगगड भाविकांनी गजबजला

वणी-सप्तशृंगगड घाटरस्त्यावर वाहनांची वर्दळ सप्तशृंगगड : प्रतिनिधी दिवाळीच्या सुट्ट्या संपून दैनंदिन कामकाजाला सुरुवात झाली असली,…

1 hour ago