नाशिक

महापौर, उपमहापौरांनी मांडले विकासाचे व्हिजन

विकासाचा शंभर दिवसांचा कार्यक्रम : आडके; संधीचे सोने करून दाखवीन : शिंदे

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेत शुक्रवारी महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाल्याने भाजपच्या हिमगौरी आडके-आहेर तर उपमहापौर विलास शिंदे यांची निवड झाली. दरम्यान, निवडणुकीचा कार्यक्रम पार पडताच महापौर हिमगौरी आडके-आहेर व उपमहापौर शिंदे यांनी शहर विकासाचे व्हिजन मांडत संपूर्ण शहरात विकासाची कामे करणार असल्याचे बोलून दाखवले.
महापौर हिमगौरी आडके-आहेर म्हणाल्या, शहराच्या विकासासाठी 100 दिवसांचा विशेष कार्यक्रम आखण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक प्रभागातील नगरसेवक, महापालिकेचे अधिकारी व तेथील नागरिकांना बरोबर घेऊन पाहणी करून, तेथील समस्या जाणून घेऊ. कामातून ताकद, निष्ठा व विकास घडवायचा आहे. विरोधी नेत्यांनाही हिच अपेक्षा आहे. प्रभाग निधीबरोबरच शासनाकडून वेगवेगळ्या योजनांसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहील. कुंभमेळ्यासाठी सर्व जण एकत्रित काम करणार असल्याने नाशिककरांचा यात सहभाग महत्त्वाचा असल्याचे म्हटले. तर उपमहापौर विलास शिंदे म्हणाले, कुंभमेळ्यामुळे शहराची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होणार असून, या संधीचा उपयोग शहराच्या भविष्याचा मजबूत पाया घालण्यासाठी केला जाईल. या संधीचे नक्कीच सोने करून दाखवीन, कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचा जास्तीत जास्त विकास करायचा आहे. पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उपमहापौरपदासाठी दिलेली संधी आपल्यासाठी महत्त्वाची असून, या संधीचे नक्कीच सोने करून दाखवीन, असा विश्वास उपमहापौर शिंदे यांनी व्यक्त केला.

आ. फरांदे, हिरेंकडून नगरसेवकांचे स्वागत

राजीव गांधी भवनमधील मनपा सभागृहाबाहेर आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे सकाळी दहा वाजताच दाखल झाल्या होत्या. त्यांनी सभागृहात येणार्‍या सर्वच नगरसेवक, नगरसेविकांचे स्वागत केले. सर्वांना आपल्या कामकाजासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी काही नगरसेविक त्यांच्या पायाही पडल्या. तसेच महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांचेही त्यांनी स्वागत करत शुभेच्छा दिल्या.

 

Mayor, Deputy Mayor present vision for development

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

2 hours ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

2 hours ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

2 hours ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

3 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

3 hours ago