चेन्नई : प्रतिनिधी
तामिळनाडूमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या जीवनावर आधारित गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. चेन्नईतील आर. के. नगर (कोडुनगैयुर) भागात मुख्यमंत्र्यांचा ’सिनेमा ते राजकारण’ असा प्रवास उलगडणार्या तीन वेगवेगळ्या गणेशमूर्ती बसवण्यात आल्या आहेत. यात श्रीगणेशाला मुख्यमंत्री विजय यांच्या ’घिल्ली’ या चित्रपटात कबड्डी खेळताना, निवडणूक प्रचारादरम्यान सायकल चालवताना आणि तामिळनाडू विधानसभेत त्यांनी केलेल्या एका विशेष हातवार्याच्या (हँड जेस्चर) रूपात साकारण्यात आले आहे. राजेश नामक आयोजकाने मुख्यमंत्र्यांच्या राजकीय प्रवासाला मानवंदना देण्यासाठी हा प्रयोग केल्याचे म्हटले असले तरी, या अनोख्या मूर्तींमुळे राज्यात आता मोठा धार्मिक आणि राजकीय वाद उभा राहिला आहे. या प्रकारावर ’भारत हिंदू मुन्नानी’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हे हिंदू देवतांचे तसेच स्वतः मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे विडंबन व गैरवापर असल्याचे म्हटले आहे.
Chief Minister depicted as Lord Ganesha; controversy in Tamil Nadu.