मुख्य सचिवांनी केली कुंभमेळा विकासकामांची पाहणी

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध विकासकामांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. विविध प्रकल्पांची प्रगती, गुणवत्ता आणि वेळापत्रक याबाबत त्यांनी संबंधित अधिकार्‍यांकडून सविस्तर
माहिती घेतली.
या पाहणी दौर्‍यात कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, सहायक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिवांनी द्वारका सर्कल येथील भुयारी मार्ग, तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराजवळील समांतर पूल, कपिला संगम, साधुग्राम तसेच गोदावरी नदीकाठावरील नवीन घाटांच्या कामांची पाहणी केली. यासोबतच तपोवन, आगरटाकळी व दसक-पंचक परिसरातील मलजल शुद्धीकरण प्रकल्पांचा आढावा घेतला.
तसेच पांडवलेणी परिसरातील घनकचरा व्यवस्थापन व खतनिर्मिती प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि राजूर बहुला येथील वीज उपकेंद्राचीही पाहणी करण्यात आली.
मुख्य सचिव अग्रवाल यांनी कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांच्या दृष्टीने सर्व कामे वेळेत, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

पाहणीतील प्रमुख कामे

द्वारका सर्कल भुयारी मार्ग तपोवन समांतर पूल गोदावरी नदीकाठावरील घाट   विकास साधुग्राम व कपिला संगम परिसर सुधारणा
मलजल शुद्धीकरण प्रकल्प (तपोवन, आगरटाकळी, दसक-पंचक)
घनकचरा व्यवस्थापन व खत प्रकल्प जलशुद्धीकरण प्रकल्प राजूर बहुला वीज उपकेंद्र

पुढील दोन दिवसांचा दौरा

पांडवलेणी येथे भेट
नाशिकरोड रेल्वेस्थानकातील कामांची पाहणी
धुळे रोडवरील पार्किंग व्यवस्थेचा आढावा रामकुंड परिसरातील विकासकामांची तपासणी स्मार्ट सिटी कार्यालयात कुंभमेळा आढावा बैठक

Chief Secretary inspects Kumbh Mela development works

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

प्रभाग 30 मधील उद्यानाला अवकळा

सिडको : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधील रिद्धिसिद्धी मंदिरालगत असलेल्या उद्यानाची दुरवस्था झाली…

1 minute ago

इच्छाशक्तीचा महाकुंभ : वर्षीतप समापनातून संयम आणि चैतन्याचा जागर

आजचा सूर्योदय एका आगळ्यावेगळ्या ऊर्जेचा साक्षीदार असेल. गेल्या वर्षभरापासून अन्नाचा त्याग करून केवळ आत्मिक शक्तीच्या…

52 minutes ago

जिव्हारी लागलेला पराभव

संसदेच्या दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमत नसतानाही सरकारने लोकसभा व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के…

1 hour ago

शेतीला ‘हिट’चा तडाखा

40 पार तापमानामुळे पिके होरपळली! नाशिक : विशेष प्रतिनिधी आजपासून ‘सौर ग्रीष्म ऋतू’ सुरू होत…

1 hour ago

मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ?

अंधशाळेतील निदेशकाची नियुक्ती वादात नाशिक : प्रतिनिधी मतिमंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित गंभीर प्रकार समोर आला…

1 hour ago

‘अक्षय’ खरेदीने बाजारपेठेला झळाळी

तीन हजार दुचाकी, दीड हजार चारचाकींची विक्री; 450 फ्लॅट्सचे बुकिंग नाशिक : प्रतिनिधी साडेतीन मुहूर्तार्ंपैकी…

2 hours ago