नाशिक

नागरिकांचे जलकुंभावर चढून आंदोलन

प्रभाग 24 मध्ये पाणीप्रश्न गंभीर

सिडको : विशेष प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 24 मध्ये पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. कर्मयोगीनगर येथे बांधण्यात आलेल्या नवीन जलकुंभातून पाणीपुरवठा करून टंचाई दूर करा, अशी मागणी करीत बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनसह नागरिकांनी मोर्चा काढला. जलकुंभावर चढून आंदोलन केले. महापालिका अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

गोविंदनगर, कर्मयोगीनगर, कालिका पार्क, जगतापनगर, जुने सिडकोसह प्रभाग 24 मध्ये गेल्या दोन वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई आहे. अनेकदा निवेदने देऊन रस्त्यावर उतरूनही ही समस्या सुटत नाही. सहा दिवसांपूर्वी महापालिका पाणीपुरवठा अधिकार्‍यांची भेट घेण्यात आली. तरीही यात सुधारणा झाली नाही. काल शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखाली हंडे, भांडे घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, पाणी चोरांवर कारवाई करा, पाणी नाही तर घरपट्टी-पाणीपट्टी नाही, अशा घोषणा देत नागरिक कर्मयोगीनगर येथील जलकुंभावर पोहोचले. जलकुंभावर चढून पाणीटंचाई दूर करण्याची मागणी करण्यात आली. महापालिका उपअभियंता हेमंत पठे, जितेंद्र चव्हाण, नाना गायकवाड, किरण साठे आदींनी आंदोलकांशी चर्चा केली. शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनीही या अधिकार्‍यांशी चर्चा केली. पाणीप्रश्न सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला.
या आंदोलनात शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, प्रभाकर खैरनार, आनंदा तिडके, राजेश पाटील, बाळासाहेब राऊतराय, महेश जाधव, अविनाश कोठावदे, जयदीप पेंढारकर, देवीदास तांबोळी, विनोद पोळ, हेमंत नेरकर, किरण काळे, अशोक पाटील, साधना देशमुख, ज्योती देशमुख, योगिता गहिवड, रूपाली मुसळे, भारती चौधरी, अमृता नेरकर, शिल्पा मुळे, नंदिनी जाधव, विशाखा थोरात, अवनी कुलकर्णी, कविता कोठावदे, श्वेेता काळे, तेजस्विनी पवार, अनिता आमटे, संगीता देशमुख, रमेश शिंदे, प्रथमेश बडगुजर, योगेश नेरकर, प्रकाश देशमुख, शशिकांत मोरे, रामदास चौधरी, संग्राम देशमुख, अमोल विसपुते, हेमंत चव्हाण, पुरुषोत्तम शिरोडे, मनोज पाटील, राजेंद्र भुसारी, दत्तात्रय बाचकर, दत्तात्रय चासकर, संदीप गहिवड आदींसह नागरिक सहभागी
झाले होते.

 

Gavkari Admin

Recent Posts

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास

एसी लोकलमध्ये प्रवाशाचा चक्क छत्री उघडून प्रवास शहापूर : साजिद शेख लोकल ही मुंबईतल्या प्रवाशांची…

21 hours ago

सर्प विज्ञानाची गरज

ह्मलोकेषु ये सर्पा शेषनाग परोगमा:। नमोस्तुतेभ्य: सर्पेभ्य: सुप्रीतो मम सर्वदा॥ ब्रह्मलोकामधील सर्व सर्पांचा राजा नागदेव…

22 hours ago

आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली

यंदा राख्यांना महागाईची वीण नाशिक : प्रतिनिधी बहीण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा रक्षाबंधन सण दहा…

22 hours ago

तुजवीण शंभो मज कोण तारी!

पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली नाशिक : प्रतिनिधी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी महादेव मंदिरांत…

23 hours ago

पाथर्डीत वर्षभरात एकाच रस्त्याचे चार वेळा काम

महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे; नागरिकांत नाराजी इंदिरानगर : वार्ताहर पाथर्डी फाटा प्रभाग क्रमांक 31 मधील…

23 hours ago

माणिकराव कोकाटे अजित दादांच्या भेटीला

मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…

1 day ago