दोनशे जणांना नोटिसा; 25 हजारांचा दंड
नाशिक : प्रतिनिधी
ओला व सुका कचर्याच्या वर्गीकरणाकडे दुर्लक्ष करणार्या नागरिकांना महापालिकेने दणका देत 25 हजारांचा दंड ठोठावला आहे. शिवाय दोनशे नागरिकांना नोटिसा धाडल्या आहेत. कचरा वर्गीकरणाकडे दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागाने गेल्या आठवड्यापासून नागरिकांना ओला व सुका कचर्याचे वर्गीकरण करूनच घंटागाडीत कचरा देण्याचे आवाहन केले होते. या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असाही इशारा दिला होता; परंतु तरीही शहरातील काही नागरिकांनी महापालिकेच्या या आवाहनास केराची टोपली दाखवली आहे. अखेर याप्रकरणी दोनशे नागरिकांना दणका देत नोटिसा धाडत 25 हजारांचा दंड ठोठावला. कचर्याचे वर्गीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत.
दरम्यान, येत्या काही दिवसांत कचर्याचे वर्गीकरण मोहीम व्यापक केली जाणार आहे. घनकचरा विभागाने सहाही विभागांतील स्वच्छता निरीक्षकांना याकडे लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. रहिवासी सोसायट्यांसह हॉटेले, लॉन्सधारकांनाही कचर्याचे वर्गीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. ओला व सुका कचर्याच्या वर्गीकरणासाठी
महापालिका प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. यासाठी शाळा, महाविद्यालयांतूनही प्रबोधन केले गेले. मात्र, तरीही नागरिकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नागरिकांनी ओला व सुका कचर्याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीत द्यावा. अन्यथा याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जाईल.
– अजित निकत, घनकचरा प्रमुख, मनपा
अशी झाली कारवाई
विभाग नोटिसा दंड
नाशिक पश्चिम 27 2,300
नाशिक रोड 50 14, 900
सातपूर 50 1,100
पंचवटी 48 5,600
सिडको 07 —
नाशिक पूर्व 20 3,000
एकूण 182 25,900
लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…
ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…
नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…
कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…
पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…
अन्यथा अधिकार्यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…