दि. 5 ते 11 ऑक्टोबर 2025
पुरुषोत्तम नाईक

मेष : प्रगती होईल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, राहू, केतू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. शुक्र प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात व्यापारी, व्यावसायिकांची चौफेर प्रगती होईल. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील. कुठल्याही मोहात पडणे टाळा. आरोग्य चांगले राहील. संयम ठेवा.
वृषभ : सुखवार्ता कळतील
या सप्ताहात बुध, शुक्र, शनि, गुरू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, राहू, केतू प्रतिकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना संकटातून वाटचाल करावी लागेल. व्यापारी, व्यावसायिकांना सावधपणे निर्णय घेणे आवश्यक राहील. विरोधकांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करू नका. सुखवार्ता कळतील. आरोग्य चांगले राहील.
मिथुन : मंगलवार्ता कळतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च आटोक्यात राहतील. नोकरदारांना बढती, बदलीचे योग संभवतात. व्यापारी, व्यावसायिकांना मंगलवार्ता कळतील. मनाला अस्वस्थता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य चांगले राहील.
कर्क : पैशांची आवक वाढेल
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. मंगळ, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैशांची आवक वाढेल. खर्चही वाढतील. नोकरदारांनी वरिष्ठांशी वाद टाळणे इष्ट ठरेल. व्यापारी, व्यावसायिकांनी महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. प्रवास शक्यतो टाळा. वाहन जपून चालवा. प्रकृतीची काळजी घ्या.
सिंह : पगारवाढ मिळेल
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनि, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना पगारवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. मानसिक अस्वस्थ जाणवेल. कौटुंबिक वाद सामंजस्याने सोडवा. आरोग्य प्रश्नांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
कन्या : अचानक धनलाभ
या सप्ताहात मंगळ, बुध, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदारांना अडचणी सतावतील. समस्या बिकट बनतील. व्यापारी, व्यावसायिकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रेमीजनांची आगेकूच होईल. खर्च वाढतील.
तूळ : आडाखे अचूक ठरतील
या सप्ताहात मंगळ, रवी, बुध, गुरू, राहू, केतू अनुकूल आहेत. शुक्र, शनि प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागेल. खर्च वाढतील. नोकरदारांना सावधपणे काम करणे गरजेचे आहे. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. शासकीय, कोर्ट-कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : लाभ होतील
या सप्ताहात शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, गुरू, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. या सप्ताहात प्रवास टाळणे इष्ट ठरेल. वाहन जपून चालवा. शेअरमध्ये लाभ होतील. नोकरदारांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काळजी घ्या.
धनु : व्यवसायवृद्धी
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. शनि प्रतिकूल आहे. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदारांच्या समस्या सुटण्याच्या मार्गावर येतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृद्धी होईल. नवीन घर, वाहन खरेदीची प्रकरणे मार्गी लागतील.
मकर : जोरदार आगेकूच
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक संकटातून मार्ग निघतील. धनचिंता दूर होतील. नोकरदारांची प्रगती होईल. व्यापारी, व्यावसायिकांची जोरदार आगेकूच होईल. विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : भाग्योदय होईल
या सप्ताहात मंगळ, शुक्र, बुध, गुरू अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, शुक्र, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे मिळतील. नोकरदारांचा भाग्योदय होईल. व्यापारी, व्यावसायिकांच्या समस्या मार्गी लागतील. शासकीय, कोर्ट-कचेरीची कामे मनाप्रमाणे होतील. आरोग्याची काळजी घ्या.
मीन : धनचिंता दूर होतील
या सप्ताहात शुक्र अनुकूल आहे. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. रवी, मंगळ, बुध, राहू, केतू प्रतिकूल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. धनचिंता दूर होतील. नोकरदारांना समस्या सतावतील. व्यापारी, व्यावसायिकांचे निर्णय चुकतील. प्रवास टाळा, वाहन जपून चालवा.

Editorial Team

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

18 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

18 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

18 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

18 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

18 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

19 hours ago