चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज
नाशिक : प्रतिनिधी
महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत 31 ऑक्टोबरला होणार्या सिंहस्थ ध्वजारोहणामुळे संपूर्ण शहर भगव्या पताकांनी आणि ध्वजांनी सजले आहे. पंचवटी कारंजा, गोदाघाट तसेच रविवार कारंजा यांसह शहरातील सर्वच चौकांना भगवे करण्यात आले आहे. घराघरांवरही भगवे ध्वज फडकत असल्याने शहरात भगवेमय वातावरण दिसून येत आहे.
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार तयारी केली जात आहे. उद्या राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याने रात्रीचा दिवस करून तयारीला वेग दिला जात आहे. गोदाकाठावर स्टेजची उभारणी करण्यात आली असून, अयोध्येप्रमाणेच गोदाघाटही सजविण्यात आला आहे. हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याने प्रशासन व कारागीर अहोरात्र मेहनत घेताना दिसून येत आहेत. भगव्या पताका, ध्वज, स्वागत कमानींमुळे धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, होळकर पुलावरही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाशिकला कुंभनगरी म्हणून विशेष महत्त्व आहे. गोदावरी नदी, रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक परंपरांमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याला देशभरातील भाविकांची उपस्थिती लाभते.
ध्वजारोहणासाठी गोदाघाटही सजविण्यात आला असून, भव्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
City turns saffron for flag-hoisting ceremony
नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…
व्यावसायिकांची कोंडी; व्हीआयपींच्या स्वागताच्या मुद्यावरून नाराजीनाट्य त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ध्वजारोहणाच्या त्र्यंबक…
जलआरक्षणात 1,350 एमसीएफटीची तूट नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या…
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मनपाला पत्र नाशिक : प्रतिनिधी द्वारका ते नाशिकरोड येथील दत्त मंदिर…
नाशिक : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐन दिवाळीच्या सणात होणारी 15 टक्के हंगामी…