महाराष्ट्र

फिरायला जाताय, एनसीएमसी कार्ड नोंदणी केली का?

आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी

नाशिक : प्रतिनिधी
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.दिवाळीच्या सुटीत बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले जाते. महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे करण्यात आले असले तरी अजूनही अनेक महिलांनी हे कार्डच काढलेले नाही. त्यामुळे त्यांना प्रवासात पूर्ण भाडे भरून प्रवास करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीचे राष्ट्रीय समान वाहतूक कार्ड (एनसीएमसी)स्मार्ट कार्ड नोंदणीला जिल्ह्यात प्रवाशांचा प्रतिसाद लाभतो आहे.
दि. 29 पर्यंत नाशिक जिल्ह्यात एकूण 8 लाख 81 हजार 815 प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी पूर्ण केली आहे. यामध्ये महिला सन्मान योजनेतील प्रवाशांचा सर्वाधिक वाटा असून, तब्बल 7 लाख 15 हजार 848 महिला प्रवाशांनी नोंदणी केली असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या नाशिक विभागाकडून देण्यात आली आहे.
सवलतधारक प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, गतिमान, पारदर्शक करण्यासाठी एसटीने हे स्मार्ट कार्ड सुरू केले आहे. या कार्डमुळे रोख रकमेचा व्यवहार टाळून तिकीट वितरण अधिक सोपे होणार आहे.
दिवाळी लक्ष्मीपूजन 8 नोव्हेंबरला आहे. दिवाळी पाडव्यानंतर भाऊबीज सणासाठी गावाकडे सहकुटुंब जात असतात. त्यामुळे एसटी बसस्थानकांवर मोठी गर्दी होते. वाढत्या गर्दीसाटी जादा बसेसचेही नियोजन एसटी महामंडळाने केले आहे.
गावी, परगावी, देवदर्शनासाठी, सहलीसाठी फिरण्यासाठी नागरिक लालपरीला पसंती देतात. सुरक्षित प्रवासासाठी एसटीतून प्रवास केला जातो. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला प्रवाशांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. दिवाळीपूर्वी ऐनवेळेची धावपळ टाळण्यासाठी जिल्ह्यातील प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानकात, एसटी आगारात किंवा अधिकृत प्रतिनिधीकडे जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी प्रतिसाद वाढत असून, सणाच्या पार्श्वभूमीवर ऐनवेळी धावपळ करण्याऐवजी कार्ड अधिकृत प्रतिनिधीकडे जाऊन नोंदणी करावी.
– उमेश बिरारी, विभागीय वाहतूक अधिकारी

प्रवर्गनिहाय आकडेवारी
महिला सन्मान योजना :                         7,15,848
अमृत ज्येष्ठ नागरिक (75 वर्षांवरील) :   78,480
ज्येष्ठ नागरिक :                                     76,202
इतर सवलत प्रवर्ग :                                 11,285
एकूण :                                                    8,81,815

 

Heading out for a trip? Have you registered your NCMC card?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कुंभमेळ्याच्या जागेसाठी शासनाने ठोस भुमिका घ्यावी

नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार सिडको : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या…

4 minutes ago

ध्वजारोहणासाठी शहर भगवेमय

चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…

21 minutes ago

त्र्यंबकनगरीला पोलीस छावणीचे स्वरूप

व्यावसायिकांची कोंडी; व्हीआयपींच्या स्वागताच्या मुद्यावरून नाराजीनाट्य त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ध्वजारोहणाच्या त्र्यंबक…

54 minutes ago

दिवाळीनंतर शहरात पाणीकपात अटळ

जलआरक्षणात 1,350 एमसीएफटीची तूट नाशिक : प्रतिनिधी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या…

1 hour ago

द्वारका महामार्गासाठी दाखला द्या

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाचे मनपाला पत्र नाशिक : प्रतिनिधी द्वारका ते नाशिकरोड येथील दत्त मंदिर…

1 hour ago

दुष्काळामुळे यंदा दिवाळीत एसटीची भाडेवाढ नाही

नाशिक : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐन दिवाळीच्या सणात होणारी 15 टक्के हंगामी…

1 hour ago