नरेंद्र महाराज : ‘जेन झी’च्या ताकदीचे 42 उपक्रमांतून दर्शन घडवणार
सिडको : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यासाठीची जागा आरक्षित ठेवून तेथे आवश्यक सुविधा निर्माण करण्याबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी जगद्गुरू नरेंद्र महाराज यांनी केली. कुंभमेळा ही प्राचीन परंपरा असून, त्याच्या आयोजनासाठी कायमस्वरूपी नियोजन आवश्यक आहे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभर पोहोचत असेल तर त्यात गैर काय, असा सवालही त्यांनी केला.
नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुरोहित संघाच्या वतीने होणार्या ध्वजारोहण सोहळ्यास आपल्याला पुरोहित संघ, पालकमंत्री आणि प्रशासनाकडून निमंत्रण मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. पुरोहित संघाचा ध्वजारोहण कार्यक्रम आणि आपल्या संप्रदायाचा ध्वजारोहण कार्यक्रम वेगवेगळे असल्याचे स्पष्ट करत आपल्या संप्रदायाचा ध्वजारोहण सोहळा 24 जुलै रोजी होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी शोभायात्रेतून पर्यावरण संवर्धन, जागतिक तापमानवाढ, दुष्काळाची परिस्थिती आणि वृक्षलागवड याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या शोभायात्रेत 42 उपक्रमांच्या माध्यमातून तरुण पिढीची ताकद आणि सामाजिक योगदान दाखविण्यात येईल. विविध संप्रदायही या शोभायात्रेत सहभागी होणार असून, मोठी गर्दी अपेक्षित असली तरी मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येईल, असे नरेंद्र महाराज यांनी सांगितले.
‘जेन-झी’ने विकासासाठी योगदान द्यावे
तरुणांच्या आंदोलनाबाबत बोलताना नरेंद्र महाराज म्हणाले, की तरुणांनी देशाच्या विकासासाठी काम करावे. त्यांच्या आंदोलनाचा मूळ उद्देश भरकटू नये आणि विघातक प्रवृत्तींनी त्याचा गैरफायदा घेऊ नये. तरुणांच्या मागण्या योग्य असतील तर त्याला विरोध करण्याचे कारण नाही. मात्र, आंदोलनाच्या माध्यमातून समाजासाठी सकारात्मक योगदान देण्याची जबाबदारीही तरुणांनी ओळखली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
वृक्षतोडीत समतोल साधण्याची गरज
सिटीलिंकसह विकासकामांच्या संदर्भात बोलताना नरेंद्र महाराज यांनी वृक्षसंवर्धनाची भूमिका स्पष्ट केली. आपण पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारे कार्यकर्ते असून, झाडे वाचविणे आणि अधिकाधिक झाडे लावणे आवश्यक आहे. ज्या जागेवर धार्मिक अनुष्ठान केले आहे, ती जागा सोडून अन्यत्र जाणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी या प्रश्नावर समाजाने सुवर्णमध्य काढण्याची गरज व्यक्त केली.
गोदावरी प्रदूषण रोखण्याची गरज
दुष्काळाच्या परिस्थितीबाबत विचारले असता, गरज भासल्यास मदतीसाठी पूर्ण ताकदीने पुढे येऊ, असे नरेंद्र महाराज यांनी सांगितले. गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणाचे रक्षण आणि नदीचे पावित्र्य जपणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा
टोरांटो प्रकल्पासंदर्भात बोलताना त्यांनी विकासासाठी ऊर्जेची गरज लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनाचाही विचार करण्याची भूमिका मांडली. विकासकामांना विरोध करण्याऐवजी पर्यायी जागांवर वृक्षलागवड करावी. नागरिकांनीही पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा आणि विकासाच्या प्रक्रियेत शासनाच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
The government should take a firm stand regarding the site for the Kumbh Mela.
तीन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात सिडको : प्रतिनिधी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघाच्या…
पहाटेच्या वेळी कानावर पडणारा पक्ष्यांचा गोड, मधुर अन् मंजूळ किलबिलाट कोणाला बरं आवडत नाही? सूर्य…
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटक या मोठ्या राज्यांतील विधान परिषदांच्या पदवीधर व शिक्षकांच्या 28…
चौकाचौकात भगव्या पताका, घरांवरही फडकले ध्वज नाशिक : प्रतिनिधी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख…
आठ लाखांहून अधिक प्रवाशांची आतापर्यंत नोंदणी नाशिक : प्रतिनिधी दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली…
व्यावसायिकांची कोंडी; व्हीआयपींच्या स्वागताच्या मुद्यावरून नाराजीनाट्य त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ध्वजारोहणाच्या त्र्यंबक…