दुचाकीस्वार थोडक्यात बचावले
सिडको : विशेष प्रतिनिधी
उंटवाडी परिसरात रात्रीच्या सुमारास सिडकोकडे जाणार्या सिटीलिंक बसचा अपघात झाला. या अपघातात बसने मार्गावरील तीन ते चार वाहनांना धडक दिल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला. उंटवाडी सिटी सेंटर मॉलजवळील सिग्नल परिसरात एका दुचाकीला धडक बसण्याच्या घटनेत दुचाकीवरील दोन तरुणांनी प्रसंगावधान राखत वाहनावरून उडी मारल्याने ते थोडक्यात बचावले.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत तातडीने कारवाईची मागणी केली. तसेच घटनेनंतर बसचालकाने नागरिकांशी अरेरावी व शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक फडोळकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेऊन बससह अंबड पोलीस ठाण्यात नेले. पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, घटनेनंतर बसचे दरवाजे काही काळ बंद असल्याने बसमधील प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागल्याची तक्रार नागरिकांनी केली. बसचालकासह संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
Citylink bus accident in Untwadi; crashes into four vehicles.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…