दि.28 ते 4 जुलै 2026
पुरुषोत्तम नाईक
मेष : आडाखे अचूक ठरतील
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत.शनिची साडेसाती, गुरू प्रतिकुल आहे. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्तिक परिस्थिती चांगली राहील. पैशांचे नवस्त्रोत सुरू होतील. नोकरदारांना अडचणीतून मार्ग सापडतील. व्यापारी, व्यावसायिकांचे आडाखे अचूक ठरतील. खर्च वाढतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. प्रकृती जपा.
वृषभ : अचानक धनलाभ
या सप्ताहात रवी, मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांच्या अडचणीत भर पडेल. व्यापारी, व्यावसायिकांचे प्रयत्न यशस्वी होतील. अचानक धनलाभाचे योग यावेत. संयम पाळा. प्रकृती सांभाळा.
मिथुन : पैसे वसूल होतील
या सप्ताहात बुध, गुरू, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, प्रतिकुल आहेत. चंद्र्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांना कामाचा ताण वाढेल. व्यापारी, व्यावसायिकांचे अडकलेले पैसे वसूल होतील. प्रवास टाळा. वाहन जपून चालवा. शेअरमध्ये लाभ होईल. प्रकृती सांभाळा. कुपथ्य टाळा.
कर्क : कौतुक होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, शुक्र, शनि अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे प्रतिकुल आहेत. या सप्ताहात धनचिंता सतावतील. आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. खर्च वाढतील. नोकरदारांच्या धाडसाचे कौतुक होईल. व्यापारी व्यावसायिकांची समिकरणे जुळतील. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह : गणित बिघडेल
या सप्ताहात रवी, मंगळ अनुकूल आहेत. बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागेल. खर्च वाढतील. अडकलेले पैसे वसूल होणार नाहीत. नोकरदारांवर वरिष्ठ नाराज होतील. व्यापारी, व्यावसायिकांचे गणित बिघडेल. आरोग्यप्रश्न उग्र रूप धारण करतील. सावध रहा.
कन्या : मार्ग मोकळे होतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सपताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यशप्राप्ती होईल. व्यावसायिकांचे पैशांचे मार्ग मोकळे होतील. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ : आर्थिक सुधारणा
या सप्ताहात रवी, बुध, शुक्र, राहू, केतू अनुकूल आहेत. गुरू संमिश्र आहे. शनि, मंगळ, प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. खर्च नियंत्रणात राहतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या अडचणी दूर होतील. शेअरमध्ये लाभ होतील. प्रवास टाळा. प्रकृती जपा.
वृश्चिक : आर्थिक समृध्दी
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक समृध्दी प्राप्त होईल. शासकीय, कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळेल. नोकरदारांच्या चुका उघड होतील. व्यापारी, व्यावसायिकांची व्यवसायवृध्दी होईल. शेअरमध्ये लाभ होतील. प्रकृती सांभाळा.
धनु : आर्थिक दिलासा
या सप्ताहात राहू, केतू अनुकूल आहेत. रवी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. या सप्ताहात आर्थिक दिलासा मिळेल. खर्च वाढतील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांच्या फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका.
मकर : यशप्राप्ती होईल
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि अनुकूल आहेत. रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च नियंत्रणात राहतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश प्राप्ती होईल. नोकरदारांना पगारवाढ मिळेल. व्यापारी, व्यावसायिकांचा नफा वाढेल. शेअरमध्ये लाभ होईल. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : वाद टाळा
या सप्ताहात रवी, बुध अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, गुरू संमिश्र आहे. मंगळ, शुक्र, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. खर्च वाढतील. नोकरदारांनी वाद टाळावेत. व्यापारी, व्यावसायिकांनी कुणाच्या गोड बोलण्याला भुलू नये. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्य जपा.
मीन : विवाह जमतील
या सप्ताहात मंगळ, बुध, गुरू, शुक्र अनुकूल आहेत. शनिची साडेसाती, रवी, राहू, केतू प्रतिकुल आहेत. चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. नोकरदार व व्यापारी, व्यावसायिकांना आनंदवार्ता कळतील. शासकीय, कोर्ट, कचेरीच्या कामात यश मिळेल. अविवाहितांचे विवाह जुळतील. मनाप्रमाणे अनुरूप वधूवर मिळतील. आरोग्य चांगले राहील.
Weekly Horoscope
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik