नाशिक

सिटीलिंकच्या चालकास मारहाण

सिन्नर-नाशिक सेवा ठप्प; संशयितांवर कारवाईची मागणी

सिन्नर ः प्रतिनिधी
नाशिक महापालिकेकडून सुरू असलेल्या सिन्नर-नाशिक सिटीलिंक बससेवेच्या एका बसचालकास शुक्रवारी (दि.22) रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने मारहाण केल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी, सिन्नर मार्गावर सेवा देण्यास चालक, वाहकांनी नकार दिल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक-सिन्नर मार्गावरील सिटीलिंकची बससेवा बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून दर 15 मिनिटाला बससेवा पुरवली जाते. विशेष म्हणजे, छोट्या-मोठ्या स्टॉपवर बस थांबत असल्याने व थेट सिन्नर न्यायालयापर्यंत सेवा मिळत असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. असे असताना शुक्रवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास एका व्यक्तीने सिटीलिंक बसचालकास मारहाण केली. यासंदर्भात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र, संबंधितावर कारवाई न झाल्याने तसेच कर्मचार्‍यांना मारहाणीच्या घटना नित्याच्याच झाल्यामुळे या मार्गावर काम करण्यास सिटीलिंकच्या कर्मचार्‍यांनी नकार दिला आहे. त्यामुळे सिटीलिंकच्या व्यवस्थापनाचीही अडचण झाली आहे. दिवसभरात नाशिकहून सिन्नरसाठी 14 बसेस सोडल्या जातात. एका गाडीच्या 4 फेर्‍या याप्रमाणे दिवसभरात 56 फेर्‍या होतात. त्यामुळे प्रवाशांना सहजगत्या या मार्गावर प्रवास करता येतो. मात्र, दोन दिवसांपासून सेवा ठप्प असल्याने सिन्नरच्या प्रवाशांमध्ये अस्वस्थता
पसरली आहे.

सिन्नर मार्गावरील सिटीलिंकच्या कर्मचार्‍यांना मारहाण करण्याच्या गेल्या वर्षभरात चार-पाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी पुरते धास्तावले आहेत. यासंदर्भात सिन्नरकर सहकार्य करत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कर्मचार्‍यांशी चर्चा करून बससेवा सुरू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ.
-मिलिंद बंड, महाव्यवस्थापक, सिटीलिंक

एकीकडे सिन्नर आगाराकडून नाशिक मार्गावर सेवा कमी आहे. दुसरीकडे सिटीलिंकची बससेवा बंद असल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे यांनी तातडीने लक्ष घालून सिन्नरकरांची गैरसोय दूर करावी.
– सुभाष जाजू

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

9 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

9 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

10 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

10 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

10 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

10 hours ago