गणेशोत्सव : मूर्ती बुकिंग, डेकोरेशनच्या साहित्य खरेदीसाठी झुंबड

नाशिक : प्रतिनिधी
गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस बाकी असल्याने शहरातील वातावरण बाप्पामय झाले आहे. हरितालिका, गणेशोत्सव, गौरींचे आगमन होणार असल्याने शहरातील बाजारपेठेसह वातावरणात नवचैतन्य पसरले आहे. त्यामुळेच घरगुती गणपतींसह मंडळांच्या गणपतींच्या स्वागताची तयारी करण्यात भाविक मग्न झाले आहेत. नाशिककर भाविक बाप्पाच्या भक्तीत तल्लीन होत जोरदारपणे स्वागताची तयारी करत आहेत. दहा दिवसांसाठी बाप्पा घरी येणार असल्याने आरास, प्रसाद यांसह डेकोरेशन आणि लोभस आकर्षक बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गणेशभक्तांची गर्दी होत आहे.

शहरातील गणेश मंडळांकडून बाप्पाच्या स्वागत मिरवणुका काढण्यात येत आहेत. ढोल-ताशा, लेझीम, डीजेसह निघणार्‍या स्वागत मिरवणुकांमुळे शहरातील वातावरणात चैतन्य पसरले आहे. त्यातच पाऊस होत असल्याने बाप्पांच्या स्वागताला वरुणराजा हजेरी लावत असल्याचे चित्र आहे.

व्यावसायिकांचे हाल

गणेशभक्तांची बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होत आहे. मेन रोड, दहीपूल, शालिमार परिसरात खरेदीसाठी चांगली गर्दी झाल्याचे चित्र होते. गर्दी आणि पाऊस यामुळे व्यावसायिकांचे प्रचंड हाल झाले. मात्र, पाऊस असतानाही बाप्पांच्या स्वागताचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

प्रसादाची मेजवानी

बाप्पाच्या स्वागतात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे बाप्पासाठी लागणारा नैवेद्य..सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीसाठी प्रसाद काय असणार, याची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असते. अनेकांना वेळेअभावी घरी प्रसाद बनवणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी स्वीट मार्टवर मोदकासह लाडू, मलाई बर्फी, काजू कतली यांसारखे पर्याय उपलब्ध असणार आहेत. तर अनेक भाविकांकडून दहा दिवसांच्या प्रसादाची आर्डर देण्यात येत आहे.

देखावे घेताहेत आकार

गणेशोत्सवाच्या काळात सर्वाधिक आकर्षण असते ते देखाव्यांचे.. आपल्या गणेश मंडळाचा देखावा सर्वांत आकर्षक आणि भाविकांना आवडावा, यासाठी गणेश मंडळांकडून विविध कल्पनांचा आधार घेत देखावे साकारण्यात येत आहेत. यात पौराणिक कथा, धार्मिक स्थळ, सामाजिक संदेश देणारे देखावे यांसह गेल्या वर्षभरात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या आधारावर आकार घेत देखावे साकारण्यात येत आहेत. गणपतीच्या आगमनाला अवघे दोन दिवस बाकी असल्याने शेवटच्या टप्प्यातील देखाव्यांची तयारी करण्यात येत आहे.

पर्यावरणपूरक बाप्पा

गणेशभक्तांकडून इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळेच शाडू मातीच्या मूर्तींना पसंती मिळत आहे. तसेच घरगुती बाप्पांच्या सजावटीत इकोफ्रेंडली डेकोरेशन करण्यावर बच्चेकंपनीचा कल आहे.

बच्चेकंपनीचा उत्साह

गणपती हा बच्चेकंपनीला मित्राप्रमाणे भासतो. त्यामुळे बाप्पांच्या बुकिंगसाठी आई -वडिलांसोबत आलेली बच्चेकंपनी आताच बाप्पांना घरी घेऊन जाण्याचा आग्रह करत रडत असल्याचे चित्र होते.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

8 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

8 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

9 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

9 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

9 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

9 hours ago