जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांना दाखल करण्यास नकार — छावा क्रांतीवीर सेनेकडून रुग्णालय प्रशासनाचा तीव्र निषेध!
नाशिक: प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात दिनांक २०/१०/२०२५ रोजी तेजस पाटील (वय १९) योगेश शेळके (वय१८) राहुल ताजने (वय २१) राहणार नाशिक हे तिघेजण अपघातात गंभीर जखमी झाले.त्यांना जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर या तिघांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यास रुग्णांसोबत जवळचा नातेवाईक नाही या कारणावरून सिव्हिल प्रशासनाने नकार दिला.ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आणि अत्यंत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया छावा क्रांतीवीर सेनेने दिली आहे.
महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपघात झाल्यास त्यांच्या नातेवाईकांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी वेळ लागतो,हे प्रशासनाला ठाऊक असतानाही अशा प्रकारे तातडीची वैद्यकीय मदत न देणे म्हणजे उपचार नाकारणे आणि निष्काळजीपणाचे उदाहरण आहे.
दोन दिवसांपूर्वी अपघात झाल्यानंतर ॲम्बुलन्स वाहकाने जखमींना जिल्हा रुग्णालयात आणले असता,तेथील ड्युटीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांना दाखल करून घेण्यास सरळ नकार दिला.जोपर्यंत त्यांच्या नातेवाईकांचे आगमन होत नाही तोपर्यंत आम्ही उपचार करू शकत नाही,असे उत्तर देत त्यांनी शासनाच्या जीआरचा हवाला दिला.इतकेच नव्हे तर संबंधितांना “हे पेशंट बिटको हॉस्पिटलला घेऊन जा”असेही सांगण्यात आले.जिल्हा रुग्णालय हे मानवतेचे मंदिर आहे त्या ठिकाणी रुग्णांची सेवा करणे हे डॉक्टरांचे परम कर्तव्य असताना अशा पद्धतीने रुग्णांना वागणूक मिळत असेल तर याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे.
या वर्तनामुळे सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे आणि त्यांच्या टीमच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.यापूर्वी देखील नाशिक जिल्हा रुग्णालयातील मनमानी आणि निष्काळजीपणाबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या,तरी प्रशासनाकडून योग्य ती कारवाई झालेली नाही.त्यामुळे छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस आरोग्य मंत्री व नाशिक जिल्ह्याचे कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन नामदार माणिकरावजी कोकाटे नामदार छगन भुजबळ नामदार दादाजी भुसे नामदार नरहरी झिरवाळ नासिक जिल्हा रुग्णालयात अकार्यक्षम अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून त्यांच्या जागी कार्यक्षम अधिकारी यांची नेमणूक करून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी तसेच नाशिक सिविल सर्जन चारुदत्त शिंदे यांची संबंधित घटनांविषयी चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्हाला मोठे जन आंदोलन उभे करावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची असेल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
छावा क्रांतीवीर सेनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत खालील मागण्या केल्या आहेत :
1️⃣ संबंधित सिव्हिल सर्जन व जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून तात्काळ बदली करण्यात यावी.
2️⃣ अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ उपचार देण्यासाठी सर्व सरकारी रुग्णालयांना सक्त आदेश जारी करण्यात यावेत.
3️⃣ “प्रथम उपचार – नंतर औपचारिकता” या तत्त्वाचा अवलंब संपूर्ण जिल्ह्यात सक्तीने लागू करण्यात यावा.
शनिवारी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस नाशिक दौऱ्यावर येत असून,छावा क्रांतीवीर सेनेचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेत नासिक सिव्हिल सर्जनच्या मनमानी कारभाराबाबत निवेदन सादर करणार आहे.यापूर्वीही जिल्हा रुग्णालयात अनेक गैरप्रकार झाल्यानंतर चौकशी आदेश देण्यात आले होते,मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याच मंडळींची पाठराखण करून प्रकरणे दडपण्याच्या घटनाही घडल्या आहेत अनेक वेळा संबंधित कुटुंबीयांनी आंदोलन करून सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही तो न्याय सुद्धा यावेळी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणार आहोत.
करण गायकर
संस्थापक अध्यक्ष,छावा क्रांतिवीर सेना
शॉपिंग सेंटरजवळ झोपलेल्या व्यक्तीचा वाहनाखाली चिरडून मृत्यू सिडको : दिलीपराज सोनार जुने सिडको परिसरातील शॉपिंग…
लाडकी बहीण योजनेच्या केवायसीला स्थगिती लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मुंबई: राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा…
राधाकृष्णनगरमध्ये परप्रातीय स्वयंघोषित भाईचा राडा गल्लीतील नागरिकांना कापून टाकण्याची धमकी देत दहशत सातपूर : सातपूर…
सिडको : विशेष प्रतिनिधी वृद्धेच्या घरी जाऊन चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडून…
जमीन खंडणी प्रकरणी सातपुर पोलिसात गुन्हा सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर परिसरात खंडणी व…
सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर गोळीबार आणि अंबड येथील बंगला खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी निखिलकुमार…