नाशिक : देवयानी सोनार
शालेय जीवनाचे संपूर्ण जीवनावर संस्कार होत असतात.त्यामुळे पालकांचा आपल्या पाल्यांना उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न असतो.बदलत्या शैक्षणिक प्रवाहात,स्पर्धेच्या युगात वेगळे,उत्तम आणि कौशल्यपूर्ण काय देता येईल आणि तो किंवा ती विद्यार्थीनी त्यांच्या आयुष्यात यशस्वी कसे होतील याबाबतीत सजग असतात. त्यामुळे आठवीपासूनच त्यांच्या शैक्षणीक पायभरणी करण्यासाठी चांगली शाळा,महाविद्यालये,क्लासेस निवडले जातात. दहावी, बारावीचे निकाल लागण्यास अजून वेळ असतानाच महाविद्यालयांशी टायअप केलेल्या क्लासेसकडून पालकांना फोन करुन क्लास,फाउंडेशन कोर्सची गळ घातली जात असल्याने पाल्यांबरोबरच पालकही गोंधळून जात आहे.
आठवी ते बारावी हा मुलांचा किशोरवयीन काळ असतो.त्यामुळे आपण नक्की कोणत्या क्षेत्रात जावे याबाबत निर्णय घेण्याची क्षमता त्यामानाने कमी असते.हीच अवस्था काही प्रमाणात पालकांचीही असते अशा वेळी विविध क्लासेस चालक ही बाब हेरून पालकांना त्यांच्या क्लासेसमध्ये प्रेवशासाठी गळ घालतांना दिसतात.दिवसाला अनेक फोन येत असल्याने पालक आणि मुलांची अवस्था इधर चला मै..उधर चला… अशी होत आहे.
मार्च एप्रिलमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या.अद्याप दहावी बारावीचा निकाल लागला नसल्याने क्लासेसचालकांकडून विविध पॅकेजेससाठी पालकांना वारंवार फोन केले जात आहे. विविध क्लासेस त्यांच्याकडील क्लासेसची वैशिष्टे,गुणवत्ता याविषयी विविध प्रलोभने,सूट,स्कॉलरशिप,इतर कॉलेजेस्शी टायअप देण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पालकांचा गोंधळ वाढला आहे.
पालकांची डोकेदुखी
कोरोना काळात ऑनलाइन शाळा असल्याने परीक्षाही ऑनलाइन घेण्याबरोबरच रद्द करण्यात आल्या होत्या.खासगी क्लासेसही ऑनलाईन सुरू होते. आठवी ते दहावीच्या मुलांना कधी क्लास तर कधी घरी किंवा ऑनलाइन शाळेत अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यात आला होता. पण यंदा ऑफलाइन परीक्षा झाल्या आणि क्लासेसनेही विद्यार्थ्यांना गळाला लावण्यासाठी तरुणी, महिलांना नियुक्त करुन पालकांना आणि विद्यार्थ्यांना क्लाससाठी प्रवेश घेणे भाग पाडले जात आहे. त्यामुळे पालकांचाही गोंधळ उडून डोकेदुखी वाढते.
फीचे आकडे डोळे पांढरे करणारे
क्लासेसचे ङ्गॅड गेल्या काही वर्षापासून वाढले आहे.घरगूती शिकवणी किंवा आताचे नामांकित क्लासेसच्या ङ्गीज पालकांना डोळे पांढरे करण्याची वेळ आणतात.
स्पर्धेच्या युगात आपला पाल्य चांगल्या गुणांनी पास व्हावा अशी अपेक्षा सगळेच पालक बाळगतात.त्यामुळे क्लासेच चालक हीच गोष्ट हेरतात. मुलांनी आठवीत प्रवेश घेतल्यापासून बारावी पर्यत सतत पालकांना आपल्या क्लासेसची गुणवत्ता आणि वैशिष्टये सांगून विविध आमिषे दाखविली जातात. महाविद्यालय सलग्न क्लासेस लावावेत,विज्ञान, आणि वाणिज्य शाखा निवडल्यास त्यातील प्रत्येक ग्रुपसाठी पॅकेज देवून भरमसाठ फी आकारली जात आहे.
पालक विद्यार्थ्याचे नंबर होतात लीक
पालक किंवा विद्यार्थ्याना अचानक क्लासेस चालकांचे किंवा त्यांच्या कार्यालयातून कसे फोन येतात? नंबर कुठून मिळतात याचेही कुतूहल वाटते.परंतु अनेकदा शाळा महाविद्यालयातूनच पालकांचे नंबर लीक केले जातात.क्लासेच चालकांना पालक विद्यार्थ्यांचा डेटा दिला जात असल्याचा संशय आहे.
काही क्लासेससंचालक चुकीच्या मार्गाचा अवलंब करुन, आर्थिक देवघेव करुन, शाळा कॉलेजमधील क्लार्क व तत्सम लोकांकडून, विद्यार्थ्यांचे पत्ते, फोन नंबर्स मिळवतात. अशा प्रकारे डाटा चोरी करणे व तो बाहेर देणे हा गुन्हाही आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ते धोकादायक आहे. संघटनेने असा डाटा, शाळा कॉलेजमधून दिला जाऊ नये यासाठी काही दिवसांपूर्वी शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले होते. पण ते गांभीर्याने घेतले गेले नाही. विद्यार्थ्यांच्या घरी फोन करून क्लासला येण्यास भाग पाडणे हे सर्वथा चुक असून, संघटना याचे समर्थन करत नाही.
जयंत मुळे,
अध्यक्ष,
नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना नाशिक