नाशिक

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल श्रीकांत पुरोहित यांची ब्रिगेडियरपदी बढती

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
मालेगावमधील 2008 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातून
निर्दोष मुक्तता झाल्यानंतर वर्षभराने भारतीय लष्कराने कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. लष्कराने त्यांना ’ब्रिगेडियर’पदी बढती देण्यास मंजुरी दिली आहे. 17 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर कर्नल पुरोहित यांच्या लष्करी कारकिर्दीतील हा सर्वांत मोठा विजय मानला जात आहे.
कर्नल पुरोहित यांच्या पदोन्नतीचा मार्ग गेल्या वर्षीच प्रशस्त झाला होता. 31 जुलै 2025 रोजी मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने त्यांना आणि इतर आरोपींना पुराव्याअभावी सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. केवळ संशयावरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही, असे ताशेरे ओढत न्यायालयाने त्यांची सुटका केली होती. या निर्णयामुळे त्यांच्यावर असलेले दहशतवादाचे सर्व शिक्के पुसले गेले.
’ब्रिगेडियर’पदी बढती आणि ऐतिहासिक संदर्भ
लष्करी वर्तुळात कर्नल पुरोहित यांची ही बढती अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे. कर्नल स्तरावर कोणत्याही युनिटचे कमांड न करता थेट ब्रिगेडियरपदी बढती मिळवणारे ते भारतीय लष्कराच्या इतिहासातील दुसरे अधिकारी ठरले आहेत. यापूर्वी केवळ फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बाबतीत असा निर्णय घेण्यात आला होता. प्रदीर्घ काळ तुरुंगात आणि कायदेशीर प्रक्रियेत गेल्यामुळे त्यांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई म्हणून लष्कराने ही विशेष पदोन्नती दिली आहे.

’आर्मड फोर्सेस ट्रिब्युनल’ची मोठी भूमिका

कर्नल पुरोहित 31 मार्च 2026 रोजी निवृत्त होणार होते. मात्र, निवृत्तीच्या काही दिवस आधी ’आर्मड फोर्सेस ट्रिब्युनल’ने त्यांच्या निवृत्तीला स्थगिती दिली. त्यांच्यावर अन्याय झाला असून, पदोन्नतीचा त्यांचा हक्क डावलला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत ट्रिब्युनलने लष्कराला त्यांच्या पदोन्नतीचा विचार करण्याचे निर्देश दिले होते.
17 वर्षांचा संघर्ष : थोडक्यात आढावा : नोव्हेंबर 2008: लष्करी गुप्तचर शाखेत असताना अटक झाली. 2008 ते 2017: सुमारे नऊ वर्षे तुरुंगवास भोगला. सप्टेंबर 2017 : सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. पुन्हा लष्करी सेवेत सामावून घेण्यात आले. जुलै 2025: विशेष न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाली. एप्रिल 2026 : ’ब्रिगेडियर’ पदावर बढती निश्चित केली.

सन्मानाची पुनर्रचना

कर्नल पुरोहित यांच्या या प्रवासाकडे भारतीय लष्करातील एका ’योद्ध्याचा’ संघर्ष म्हणून पाहिले जात आहे. या निर्णयामुळे केवळ त्यांचे पदच परत मिळाले नाही, तर त्यांची व्यावसायिक प्रतिष्ठा आणि सन्मानही लष्कराने पुन्हा बहाल केला आहे. जर ही कायदेशीर लढाई झाली नसती, तर पुरोहित कदाचित ’मेजर जनरल’ पदापर्यंत पोहोचले असते, असेही लष्करी तज्ज्ञांचे मत आहे. एकूणच, कर्नल पुरोहित यांची ही यशोगाथा केवळ एका पदाबद्दल नसून, ’सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्यावर शिक्कामोर्तब करणारी आहे. प्रदीर्घ अन्यायानंतर त्यांना मिळालेला हा न्याय लष्करी इतिहासात मैलाचा दगड ठरेल.

Colonel Shrikant Purohit, involved in Malegaon blast case, promoted to Brigadier

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…

19 hours ago

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

20 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

20 hours ago

गुन्हेगारीकडे नेणारे यशाचे शॉर्टकट्स

यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…

20 hours ago

परिवर्तनाकडे नेणारी कलाकृती- निळी सावळी नव्हाळी

आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…

20 hours ago

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…

20 hours ago