दुर्घटना घडल्यावर जाग येणार का? मयुरी सानप यांचा सवाल
पंचवटी : प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक सहामधील शांतीनगर भागातील स्वामी समर्थ केंद्राजवळील मेतकर हॉस्पिटल शेजारील विद्युत रोहित्र (डीपी) व विद्युत पोलला झुडपांनी विळखा घातला असून, पोलदेखील दिसेनासा झाला असून, या ठिकाणी दुर्घटना घडल्यानंतर महावितरण विभागाला जाग येणार आहे का, असा सवाल परिसरातील महिला मयुरी सानप यांनी केला आहे.
शांती नगर भागातील स्वामी समर्थ केंद्राजवळील मेतकर हॉस्पिटल शेजारील विद्युत रोहित्र (डीपी) व विद्युत पोलच्या दुरवस्थेबाबत महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांना जागेवर बोलवून निदर्शनास आणून दिली. या ठिकाणी झुडपांमुळे विद्युत पोल पूर्ण झाकला गेला आहे. या लाइनची देखभाल करून झुडपे स्वच्छ करण्यास सांगितले.
तसेच हा रस्ता रहदारीचा असून, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने येथील डीपी व पोल रस्त्यात येत असल्याने रहदारीचा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे डीपीला संरक्षक जाळी लावण्याची अथवा इतरत्र हलवण्याची मागणी केली. तर हे काम लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे, जेणेकरून काही अनुचित घटना घडणार नाही.
Complaint regarding ‘Mahavitaran’ pole ignored despite being lodged.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…