नाशिक

मुंबईच्या वाटेवर अडवले शेतकरी

रिंगरोडबाधित दिवसभर नजरकैदेत, शासनाचा निषेध

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्यांबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संवादातून मार्ग काढण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या शेतकरी, महिला शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतल्याची घटना घडली. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक शेतकर्‍यांना पोलिसांनी
ताब्यात घेतले.
रिंगरोडबाधित शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून शासनाकडे सातत्याने बैठकीची मागणी करत आहेत. योग्य अलाइनमेंट, न्याय्य मोबदला आणि शेतकर्‍यांच्या हक्कांचे संरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी शासनाशी चर्चा व्हावी, अशी त्यांची भूमिका आहे. वारंवार निवेदने, पत्रव्यवहार आणि बैठकीच्या मागण्या करूनही ठोस निर्णय न झाल्याने शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी नाशिक पोलिसांना आंदोलनास परवानगी नसल्याचे कळवून आंदोलकांना अडविण्याची कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकारामुळे आंदोलक शेतकर्‍यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण
झाली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केले. आंदोलनामध्ये शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, डॉ. किरण डोके, सुभाष गायकर, आशिष हिरे, वैभव दळवी, नाना पालखेडे, आकाश जाधव, शुभम देशमुख, बॉबी निकम, गोरख जाधव, अलीम सय्यद, शाहरुख मन्सुरी, संगीताताई सूर्यवंशी, सविताताई वाघ, सचिन जाधव, तेजस वाघ सहभागी होते.

संघर्षासाठी नाही, तर न्यायासाठी जात होतो

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले की, आम्ही संघर्षासाठी नव्हे तर चर्चेच्या माध्यमातून न्याय मिळवण्यासाठी मुंबईकडे जात होतो. मुख्यमंत्री संवेदनशीलपणे आमचे म्हणणे ऐकतील, या विश्वासाने आम्ही निघालो होतो. मात्र, चर्चेऐवजी हजारो शेतकर्‍यांना अटक करून लोकशाही मार्ग बंद करण्यात आला. हा प्रकार संविधानिक अधिकारांवर घाला घालणारा असून, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

Farmers stopped on the way to Mumbai.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago