नव्या नियमांमुळे शेतकर्‍यांमध्ये संभ्रम

‘सर्वसामान्यांना इंधन मिळणारच, मोठ्या खरेदीवरच निर्बंध’

लासलगाव, निफाड : प्रतिनिधी
पेट्रोल व डिझेल विक्रीबाबत केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या नियमांमुळे ग्रामीण भागात संभ्रमाचे वातावरण असले तरी, सर्वसामान्य ग्राहक व शेतकर्‍यांना इंधन मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्टीकरण निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी
दिले आहे.
केंद्र सरकारने 11 जून 2026 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक (बल्क) ग्राहकांना रिटेल पेट्रोलपंपांवरून इंधन खरेदी करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. अशा ग्राहकांना आता स्वतंत्र बल्क पुरवठा केंद्रांमधूनच खरेदी करावी लागेल. तसेच, कोणत्याही ग्राहकाला एका दिवसात 200 लिटरपेक्षा अधिक डिझेल घेता येणार नाही. रिटेल पंपावरून घेतलेल्या डिझेलची पुनर्विक्री करण्यास मनाई असून, ते केवळ वाहनांच्या टाक्यांमध्ये किंवा पीईएसओ मान्यताप्राप्त कंटेनरमध्येच भरता येईल.
सुरुवातीला तीन महिन्यांसाठी हे नियम लागू राहतील.
औद्योगिक ग्राहकांनी कमी दराचा लाभ घेण्यासाठी रिटेल पंपांवरून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केल्याने सामान्य ग्राहकांसाठी तुटवडा होऊ नये, म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. “मोठ्या प्रमाणातील खरेदी, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हे निर्बंध आहेत. इंधनाची कोणतीही टंचाई नसून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन तहसीलदार नाईकवाडे यांनी केले आहे.

शेतकर्‍यांचा मुख्य प्रश्न काय?

प्लास्टिक ड्रममध्ये डिझेल नेण्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता.
पीईएसओ मान्यताप्राप्त कंटेनरची सक्तीची अट.
शेतातील मोटारपंप, जनरेटरसाठी इंधन वाहतुकीची होणारी अडचण.
शासनाकडून यावर स्वतंत्र व सोप्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा.

Confusion among farmers due to new rules.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *