आरबीएसके कार्यक्रमामुळे आरोग्य तपासणीत विक्रमी कामगिरी

11.51 लाखांहून अधिक बालकांची तपासणी, 1,583 शस्त्रक्रिया यशस्वी

नाशिक : देवयानी सोनार
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत 2025-26 या वर्षात जिल्ह्यात बालकांच्या आरोग्य तपासणीत मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. एकूण 11 लाख 51 हजारांहून अधिक बालकांची तपासणी करण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत तपासणीचे प्रमाण वाढले असून, गंभीर आजारांवरील उपचारांमध्येही लक्षणीय प्रगती झाल्याचे चित्र आहे.
यात अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांचा जवळपास 100 टक्के सहभाग नोंदविण्यात आला आहे. शालेय जीवनात मुले काही वेळा अभ्यास किंवा खेळ,इतर उपक्रमांमध्ये मागे राहतात. याची कारणे अनेकदा आजारपण किंवा एखादा अपघात आदी असू शकते. या मुलांवर उपचार करण्यासठी पालकांकडून दिरंगाई होऊ शकते किंवा पालक असमर्थ असतील अशा वेळी ज्या मुलांना उपचाराची गरज आहे अशा विद्यार्थ्याची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी 25 जुलै 2024 मध्ये राष्ट्रीय स्वास्थ कार्यक्रमाचे सॉफ्टवेअर कार्यान्वित केले होते. पहिल्या पायलट प्रोजेक्टचा आतापयर्ंत 4 लाख 31 हजार 943 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एक हजार 583 बालकांवर विविध शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 185 बालकांची हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
एक ते पाच वर्षांआतील जन्मजात दिव्यांग, कर्णबधिर असलेल्या बालकांची तपासणी करण्यात आली. कर्णबधिर बालकांसाठी कोक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियाही सीएसआर निधीतून यशस्वीपणे पार पडल्या आहेत.
फेज-2 (ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026) दरम्यान 6 हजार 16 अंगणवाड्यांची 100% तपासणी पूर्ण झाली. यात 4 लाख 33 हजार 761 बालकांपैकी 4 लाख 31 हजार 943 बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे 4 हजार 425 शाळांमध्ये 100% तपासणी करत 7 लाख 19 हजार 859 विद्यार्थ्यांपैकी 7 हजार 19 हजार 161 विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली
आहे.
तपासणीत अनेक बालकांमध्ये विविध आजार आढळून आले. त्यांपैकी एक हजार 583 बालकांवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. यात ऑर्थोपेडिक, हर्निया, अपेंडिक्स, क्लेफ्ट लिप, स्क्विंट, डेंटल अशा विविध प्रकारच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. गंभीर आजारांत 185 बालकांची गुंतागुतीच्या हृदय शस्त्रक्रिया नामांकित रुग्णालयांमध्ये पूर्ण करण्यात आली आहे.
शाळा व शिक्षकांचा सहभाग 100% राहिला. पालकांचाही प्रतिसाद सकारात्मक असल्याचे आरबीएसके समन्वयक दीपक चौधरी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी नसल्या तरी काही ठिकाणी तांत्रिक बाबी (नेटवर्क, प्रशिक्षण) सुधारण्याची गरज अधोरेखित होत आहे.

घटक एकूण
एकूण शस्त्रक्रिया – 1,583
हृदय शस्त्रक्रिया  – 185

एकूण बालके तपासलेले उर्वरित टक्केवारी
अंगणवाडी बालके 4,33,761 4,31,943 1818 99.58
शाळेतील विद्यार्थी 7,19,859 7,19,161 698 99.90
एकूण 11,53,620 11,51104 2516 99.78

केंद्र शासनाच्या नवीन आरबीएसके 2.0 पोर्टलवर काम सुरू आहे. एक क्लिक सॉफ्टवेअरमुळे डेटा एन्ट्री, रुग्ण नोंद व फॉलोअप प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. त्यामुळे उपचार मिळण्यात होणारा विलंब कमी होण्यास मदत होत आहे.

पालकांनी मुलांना काही आजार असल्यास त्याची माहिती शाळेतील शिक्षकांना द्यावी. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत मुलांची आरोग्य तपासणी, तसेच आवश्यक उपचार मोफत करण्यात येतात. स्थलांतरित लाभार्थी असल्यास आरबीएसकेची टीम पुन्हा तपासणी करते. त्यामुळे पालक, शिक्षकांनी याची नोंद करावी. पालकांनी आरबीएसकेद्वारे मिळणार्‍या योजनेचा लाभ घ्यावा.
– डॉ. हर्षल नेहते, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी

जिल्ह्यात सध्या 76 वैद्यकीय पथके कार्यरत असून, त्यांनी ग्रामीण व शहरी भागात प्रभावीपणे काम करत संपूर्ण कव्हरेज साध्य केले आहे. तपासणीत शासकीय व अनुदानित शाळांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व शाळांमध्ये तपासणी पूर्ण झाली आहे. – दीपक चोधरी, आरबीएसके समन्वयक

Record performance in health check-ups due to RBSK program

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *